*डाॅक्टर जानाईश्री – पुरस्काराने डाॅ.कैलाश शर्मा सन्मानित*

0
1344

लातूर;दि.१० ( प्रतिनिधी ) –मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये प्राध्यापक ते संचालक या पदावर कार्यरत असलेले डाॅ. कैलाश शर्मा यांना डाॅ.गोपीकीशन भराडीया व कृषितज्ज्ञ बी.बी.ठोंबरे यांच्या हस्ते डाॅक्टर जानाईश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

      पुरस्काराचे स्वरूप होते शाल, पुष्पहार, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, सरमोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांची पगडी व रू २५,०००/-चा धनादेश. यावेळी व्यासपीठावर जानाई सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा डाॅ.गौरी कुलकर्णी, कार्याध्यक्ष सी.ए.दिलीप रांदड, सचिव अमोल बनाळे, जानाई विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष गौरव कुलकर्णी उपस्थित होते.

       प्रास्ताविक डाॅ.गौरी कुलकर्णी यांनी केले.डाॅ. गोपीकिशन भराडीया यांनी मनोगत व्यक्त केले. डाॅ.आरती संदीकर यांनी डाॅ.भराडीया यांचा, डाॅ.वैशाली टेकाळे यांनी डाॅ.कैलाश शर्मा यांचा तर संजय अयाचित यांनी बी.बी.ठोंबरे यांचा परिचय करून दिला. पुरस्कार वितरणानंतर सन्मानपत्राचे वाचन अभियंता गीता ठोंबरे यांनी केले. डाॅ.शाम कुलकर्णी व डाॅ. श्रीनिवास संदीकर यांनी डाॅ.भराडीया तर डाॅ.विश्वास कुलकर्णी व डाॅ.मनोज शिरूरे यांनी बी.बी.ठोंबरे याचा यथोचित सत्कार केला. 

       अर्थिक अडचण असलेल्या मेडीकलच्या गरजू विद्यार्थ्याच्या प्रवेश शुल्कासाठी लातूरातील डाॅक्टरांनी जानाई सारखी संस्था स्थापन करावी , अशी अपेक्षा डाॅ. कैलाश शर्मा यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केली. पद्मभूषण डाॅ.अशोकराव  कुकडे काका यांनी डाॅ.कैलाश शर्मा यांना  चित्रफितीद्वारे शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय समारोप बी.बी.ठोंबरे यांनी केला .अमोल बनाळे यांनी आभार व्यक्त केले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनुपमा पाटील यांनी केले डाॅ.मंजुषा कुलकर्णी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

       डाॅ.अशोक गानू , डाॅ.अशोक अरदवाड,डाॅ.महेश देवधर, डाॅ.अरूणा देवधर, डाॅ.राजेश पाटील, डाॅ.पी.के.शहा, डॅा.बी.आर.पाटील, डाॅ.खंडापूरकर, डॅा.श्रीरंग जटाळ, डाॅ.दिलीप देशपांडे,  उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनंत निरगुडे, विनोद कुचेरीया, आशाताई भिसे यांची  यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here