माया मोह आसक्ती ही
अधोगतीस कारणीभूत ठरते
ह भ प ज्ञानराज महाराज
………………………………..
औसा दि.२५.( अँड.शामराव कुलकर्णी यांजकडून)-
…………………………….,……
कळते पण वळत नाही तिथे मायेचा पगडा जास्त असतो माया मोह आसक्ती आणि त्यासोबत अहंकार हा माणसाला रसातळाला नेतो त्यामुळे जे कर्म कराल ते त्या भगवंताला स्मरून आणि समर्पित करण्याच्या भावनेतून करा फळ तर मिळणारच आहे पण अपेक्षा विरहित कर्म करा असे नम्र आवाहन ह भ प ज्ञानराज महाराज यांनी केले आहे.
औसा येथे संस्थानच्या नाथ मंदिरात पिठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या श्रावणमास तपोअनुष्ठान नित्य सायंकाळी चक्रीभजन साधना सेवा केल्या नंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या निरूपणात ते बोलत होते.
मनुष्य हा सतत मोहाच्या बळी पडतो मोह आवरला तर बऱ्याच गोष्टीचे मार्ग सुखकर होतात भ्रमर म्हणजे भुंगा तो कठीण अशा लाकूड झाड याला आरपार छिद्र पाडतो पण ज्या वेळा तो कमळाच्या मोहात पडतो त्यावेळेला तो आत अडकतो आणि त्याचा अंत होतो. तशीही मोहाची विपरीत परिणीती आहे म्हणून त्यास आवर घातला पाहिजे.
बुद्धीला विवेकाची जोड आणि संयम असेल ती सद्बुद्धी जागृती होऊ बुद्धीने चांगले कर्म घडतात. भक्ती करताना समजून सावध होऊन करावी अंध भक्ती व अंधश्रद्धा कुठल्याही कामाची नाही असे श्री ज्ञानराज महाराज म्हणाले.
मनाची निर्मळ अवस्था शुद्धता पवित्रता प्रसन्नता स्थिरता विश्वास दृढभाव ही प्रत्येक क्षणी असला म्हणजे आपले हातून सत्कर्म घडू शकतात.
श्री भालचंद्र हंचाटे श्री सोनवळकर सुशांत वैजवाडे श्रीकांत ढोक श्याम ढोक श्रीहरी बिराजदार आदींनी आपली माळ सेवा गुरु दरबारी रुजू केली.