आत्मिक समाधानासाठी साधना हवी
ह .भ .प .श्री ज्ञानराज महाराज
……ऍड. शाम कुलकर्णी यांजकडून………
औसा – माणूस अस्तिक असेल व नास्तिक त्याला समाधान मिळण्याची आस असते, त्यासाठी तो धडपडतो पण जर मन शुद्ध, सरळ,निर्मळ, स्वच्छ असेल, वासनेवर नियंत्रण असेल तर तो समाधान मिळवू शकतो चे समाधान मनाला स्थिर आणि शांती देणारे ठरते असे विचार ह भ प श्री ज्ञानराज महाराज माऊली औसेकर यांनी व्यक्त केले.
औसा येथे नाथ मंदिरात 5 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या वार्षिक श्रावण मास अनुष्ठान नित्य चक्रीभजन सेवेनंतर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी च्या प्रवचनात महाराज बोलत होते.
श्रावणाच्या प्रथमदीना पासून 18 व्या अध्यायातील …कर्मफलाचा आस्वादु , या दोन्हीचे नाव बंधु , कर्माचा की ,.. तरी या दोहीची विखी , जैसा बापू नातळे लेकी , तेसा हो न शके दुःखी , विहित क्रिया … ओवी क्रमांक 5 / 6 ………
या ओवीवर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रसाळ अशा वाणीतून निरूपण करताना श्रोत्यांना ओवीतील माऊलींचा मतितार्थ नीट समजावून तो गळी उतरवण्याचा ज्ञानराज महाराजांचा प्रयत्न निश्चितपणे कौतुकास्पद आहे.
आपण आपल्या बुद्धी चिंतनानुसार माऊलींचा यातील विचार समजून घेऊन तो आत्मसात करणे हीच खरी उपासना ठरते असे ते म्हणतात.
मनुष्याकडे सर्व संपन्नता पैसा जमीन जुमला ऐश्वर्य असले म्हणजेच समाधान मिळते का तर अजिबात नाही उलट ते आणखी अस्थिर अशांत असलेले आपण पाहतो परंतु दोन वेळेच्या भाकरीची भ्रांत असणारा माणूस त्याला पाहतात समाधानी दिसून येतो हा त्याच्या भावनेचा वासनेचा वृत्तीचा आणि मनाचा विषय आहे त्याची वासनाच तशा प्रकारची शुद्ध असल्याने आणि विशाल असल्याने तोच पूर्ण समाधानी आहे हे लक्षात घ्यावे.
गोस्वामी तुलसीदास यांच्या चरित्रातील कथा भाग सांगून त्यांची वृत्ती आणि कर्मच राम स्वरूप नेहमी राम भरोसे होती म्हणून त्यांच्या विशाल मनाने विश्वरूप भगवंत त्यांना भेटू शकले.
विद्ये मधून विनय विनिया मधून विवेक आणि त्यातून समाधान ही समाधानाची पायरी आहे सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान चे मूळ पुरुष सद्गुरु वीरनाथ महाराजांच्या वचनाप्रमाणे…..
विवेक विचार जयासी पुसती आले ते विश्रांती ब्रम्हाधिक याप्रमाणे संताच्या अंतरी विवेक हा कायम विश्रांतीला असतो म्हणून ते सत्पुरुष आत्मकल्याणसह जगतकल्याणास सक्षम ठरतात असे श्री ज्ञानराज महाराज म्हणाले.
माणसाने प्रपंच असेल वा परमार्थ
कसलाच अहंकार मीपणा ठेवू नये
कारण यातून मन तर अस्थिर होतेच पण राग क्रोध आणि अविवेक यातून झेपावतो आणि माणसाच्या जीवनाला तो सन्मार्गावर थांबू देत नाही म्हणून आपण आवडीचे असो किंवा नसो क्रोध यावर अंकुश ठेवला पाहिजे तरच आपणास काही प्राप्त करून घेण्याच्यासाठी पात्र ठराल असे महाराज म्हणतात .
माऊलींनी हरिपाठ मध्ये नामाची महती सांगताना ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड गगनाहुनी वाढ नाम आहे तसे आपल्या मनाची बांधणी करून घ्यावी जी नित्यनेम नामस्मरण गुरु सेवा आणि या अनुष्ठाना मधून होऊ शकेल हा विश्वास श्री ज्ञानराज महाराज यांनी शेवटी व्यक्त केला.
गुरुवारी लातूरचे श्री भागवत वडे गंगाखेडचे श्री दीनानाथ फुलवाडकर सर कोरेगावचे श्री व्यंकटराव पाटील छत्रपती संभाजी नगर येथील श्री विनीत सूर्यवंशी यांनी श्रावणानुष्ठानातील या दिवशीची माळ सेवा गुरुचरणी रुजू केली.