लातूर ( वृत्तसेवा ):- शैक्षणिक क्षेत्रामध्ये आगळे वेगळे उपक्रम घेऊन पालक- विद्यार्थ्यांची सुसंवाद साधत विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लातूर येथील ज्ञानप्रकाश शैक्षणिक संस्थेच्या वतीने नेहमीच आगळे वेगळे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. आज असा अनोखा आगळा वेगळा उपक्रम ज्ञानप्रकाशने पालक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात केला होता. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाचे रौप्य महोत्सवी वर्ष व राष्ट्रीय पालक दिनानिमित्त ‘सुजाण पालकत्वाची गुरुकिल्ली’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मनोबल दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुवेंद्र महाजन यांना प्रमुख निमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी मुलांचे पर्यावरण गीत झाले .
प्रा. यजुवेंद्र महाजन यांनी प्रथम सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त केली व ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाच्या कार्याचा गौरव केला.
पालकांशी संवाद असताना ते म्हणाले बहुतांशी पालक वर्ग स्वतःसाठी न जगता मुलांसाठी जगतात, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलांच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका आणि कोणत्याही परिस्थितीत नैतिक मूल्ये सोडू नका असे आवाहन केले .
खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणजे मोठ्ठे पॅकेज मिळवणे , डॉक्टर, इंजिनियर बनवणे नसून त्यांच्यात प्रामाणिकपणा, सेवाभाव, संयम, संवेदनशीलता, चारित्र्य, दातृत्व या गोष्टींचा विकास करणे होय.
सध्या सर्वत्र Rat race सुरू आहे. आपण आपल्या मुलांना जसे आहे तसे स्वीकारणे आवश्यक आहे. मुलं ही अनुकरणातून शिकत असतात. शिकणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.त्यापासून मुलं दूर जात आहेत .मुलं शिकत असताना होणाऱ्या चुका, कमतरता, अपयश यांचा स्वीकार पालकांनी करावा.
सध्या मुलांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे असे म्हटले जाते . हा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी प्रथम पालकांनी कुटुंबात काही नियम घालून घ्यावेत.
Generation gap लक्षात घेऊन mutual understanding ने मुलांशी संवाद साधावा. अपेक्षा,आग्रह,हट्ट या तीन पूर्णतः वेगळ्या गोष्टी आहेत. कोणत्या गोष्टीचा किती, केव्हा, कसा आणि काय विचार करावा हे पालकांनी समजून सांगावे. त्यांच्या चुका त्यांना लक्षात येऊ द्याव्यात, मुलांना वर्तन बदलासाठी वेळ लागतो .मुलांना प्रेमळ स्पर्शाची, प्रेमाची, मायेच्या शब्दांची गरज असते. मुलांना विश्वासात घ्या व त्यांच्याशी आवडीच्या गोष्टीवर संवाद साधा. औपचारिक – अनौपचारिक कधी व केव्हा वागावे याची जाणीव त्यांना करून द्यावी. त्यांच्याशी सतत सकारात्मक बोलणे असावे. पालक व मुलांचे भावनिक नाते असावे. नातेवाईकांच्यात आपलं मूल किती वरचढ आहे हे दाखवून देण्यासाठी आपण मुलं जन्माला घातली नाहीत . शेवटी त्यांनी असे सांगितले की आपण मुलांचे पालक आहोत, मालक नाहीत.
यजुर्वेंद्र महाजन यांच्या या वक्तव्यामुळे पालकांचा दृष्टीकोन बदलेल अशी आशा ज्ञानप्रकाशला वाटते .
या कार्यक्रमाच्या औचित्याने दहावीतील मुलांनी खाऊच्या पैशातून जमवलेली रक्कम लातूर ग्रीन वृक्ष टीमला पर्यावरण संवर्धन निधी म्हणून दिला.
व्याख्यानाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख सतीश नरहरे यांनी केले.यावेळी प्रमुख उपस्थिती श्री.दत्तात्रय मठपती(सहाय्यक शिक्षण उपसंचालक,लातूर) यांची होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका,संचालिका सविता नरहरे,पर्यवेक्षक अशोक गुरदाळे,सर्व शिक्षक यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमात मोठया संख्येने पालकांची उपस्थिती होती.
Congratulation