*जेष्ठ संपादक भाऊ सिनकर*
*यांचं निधन*
कोकणातील जेष्ठ वृत्तपत्र
छायाचित्रकार, दै कुलाबा दर्पणचे संस्थापक संपादक श्री. रघुनाथ विश्वनाथ तथा भाऊ सिनकर यांना आज सकाळी अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली.
ताठ कण्याचे तत्वनिष्ठ पत्रकार असलेल्या भाऊंनी रायगड जिल्ह्यातील तत्कालीन बलाढ्य राज्यकर्त्यांशी दोन हात करत, प्रतिकूल परिस्थितीत दैनिक कुलाबा दर्पण चालवले.
सत्ताधाऱ्यांच्या अवकृपेचा फटका अनेकदा त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा बसला, पण त्यांनी कधी हार मानली नाही. आर्थिक ओढाताणीच्या परिस्थितीतही झुंज चालू ठेवली. ते सतत हसतमुख असत.
अलिबाग येथील शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत सर्वांशी त्यांची मैत्री होती. वय झालं तरी ते तांबड्या एसटीतुन राज्यभर फिरत असायचे.
१९९१ साली मी अलिबाग येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून आजतागायत भाऊ सिनकर यांच्यासोबत अतिशय स्नेहपूर्ण संबंध राहिले. त्यांचे नेहमीच सहकार्य लाभले. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
बाकी त्यांचे गुण वर्णन करायला इथे जागा कमी पडेल.कोकणातील पत्रकारितेचे एक पर्व संपले. असो. भाऊंना विनम्र अभिवादन. 🙏🏻
– देवेंद्र भुजबळ
9869484800.