जेष्ठ नागरिकांनी चौक स्वच्छ करून झाडे लावली.
सर्वत्र कौतुक
लातूर-; डॉ. नीळकंठ सोनटक्के, श्री. माधव कातपुरे, श्री. चंदनखेरे गुंडअप्पा, श्री. सुरेश ढब्बाधुले, श्री. एस. बी. टकले, श्री. मुकुंद वाघमारे हे सर्व जेष्ठ नागरीक
एकमत चौकातील रस्त्याच्या मध्यवर्ती छोट्या दुभाजकावर बसून दररोज गप्पा मारत असतात.
त्या दुभाजकात बांधकाम साहित्य पडलेलं होत, खुरटे गवत वाढलेले होते. आपण ही जागा स्वच्छ करून तिथे झाडे लावायला हवी असा विचार त्यांच्या मनात नेहमी असायचा, त्यांच्या विचाराला साथ मिळाली ग्रीन लातूर वृक्ष टीमची आणि पहाता पहाता या सहा जणांनी ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांच्या मदतीने सर्व बांधकाम साहित्य बाजूला केले, गवत काढले,सर्व जागा स्वच्छ केली, साठ खड्डे करून शोभीवंत फुलांची ६० मोठी झाडे लावली.
याबरोबरच मुख्य एकमत चौकातील शोभीवंत झाडां शेजारचे अंदाजे एक ट्रॅक्टर गवत काढून चौक स्वच्छ केला. काढले. यामूळे एकमत चौकाला पूर्ववत शोभा आली. झाडांनी मोकळा श्वास घेतला.
जेष्ठांच्या या कार्याचे सर्व स्तरावरून कौतूक होत आहे. यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, आशा अयाचित, पूजा जाधव, दयाराम सुडे, कपिल काळे, राहुल माने, ज्ञानोबा फड, विदुला राजमाने, सिद्धेश माने, आकाश चिल्लरगे, राम पवार यांनीही श्रमदान करून उपक्रम पूर्ण केला.
🌳ग्रीन लातूर वृक्ष टीम🌳