◆देशात परीवर्तनाचे वारे केंद्रात इंडीया तर
राज्यात महाविकासआघाडीचे सक्षम सरकार येणार ◆
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
●लातूरात भारत जोडो पदयात्रेच्या वर्षापूर्तीनिमित्त
काँग्रेसकडून भव्य पदयात्रा●
लातूर ( प्रतिनिधी): ७ सप्टेंबर २०२३ -संपूर्ण देशात सदया परीवर्तनाचे वारे वाहत असून आगामी काळात देशात
इंडीयाचे तर राज्यात महाविकास आघाडीचे सक्षम सरकार अस्तीवात येईल असा विश्वास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरजिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर येथे भारत जोडो यात्रा वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित पदयात्रेच्या समारोप कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केला.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी
यांच्याकडून काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून लातूर शहर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विदयमाने गुरुवार दि. ७ सप्टेंबर २०२३ रोजी लातूर शहरात भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली.

भारत जोडो यात्रेमूळे
काँग्रेस पक्षात नवचैतन्य
या प्रसंगी पूढे बोलतांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक
कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहूलजी गांधी यांनी देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात देशभरात भारत जोडो यांत्रा काढली १२राज्ये २ केंद्रशासीत प्रदेशात मिळून ४ हजार किमी पायी चालून खासदार राहूल गांधी यांनी जनतेच्या मनात काँग्रेस पक्षा बददल आपूलकी निर्माण केली आहे. त्यांच्या या यात्रेमूळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहूल गांधी यांच्या पूढाकारातून देशात
विविध राजकीय पक्षाची मिळून इंडीया आघाडी तयार झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या एकाधिकारशाहीमुळे देशात महागाई, बेरोजगारी, मोठया प्रमाणात वाढली आहे विव्देषाच्या राजकारणामूळे सर्वत्र अराजकताची स्थिती निर्माण
झाली आहे. या परिस्थितीत इंडीया आघाडीकडून जनतेला हवा असलेला समर्थ पर्याय मिळाला आहे. केंद्र आणि राज्यात बेंबंदशाहीला कंटाळलेल्या जनतेला इंडीया हा विश्वासार्ह पर्याय मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात केंद्रात इंडीया आघाडीचे तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आस्तीत्वात येणार हे
निश्चीत झाले आहे.

लातूर लोकसभेची जागा
इंडीया आघाडी जिंकणार
राज्यात आणि देशात सत्ता परीवरर्तन घडत असतांना लातूरला त्यात मागे राहून चालणार नाही. यावेळी लातूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस म्हणजे इंडीया आघाडीचा आणि जिल्हयातील सहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी व्हायला हवेत या दृष्टीने आज पासून सर्व पदाधिकारी वकार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन आमदार देशमुख यांनी यावेळी
केले.
मराठा समाजाच्या आंदोलनाला
काँग्रेस पक्षाचा पाठींबा
जालना जिल्हयात मराठा समाजाच्या आंदोलकावर पोलीसानी केलेल्या लाठीहल्ल्याचा आमदार देशमुख यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी चालू केलेल्या उपोषणाला पक्षाच्या वतीने जाहीर पाठींबा त्यांनी यावेळी जाहीर केला.विद्यमान स्थितीत आोबीसी व इतर घटकांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा
समाजाला त्वरीत आरक्षण देण्यासाठी केंद्र आणि राज्यशासनाने कार्यवाही करावी अशी मागणी आमदार देशमुख यांनी यावेळी केली.

देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचवायची असेल तर सत्तेत परीवर्तन आवश्यक असल्याचे नमूद करून जनतेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मतदानरूपी अधिकाराचा यासाठी वापर करावा असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी यावेळी केले. यावेळी प्रदेश काँग्रेस सचिव अभय सांळूके, जळकोटचे उपनगराध्यक्षमन्मथआप्पा
किडे, उदगीर काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, चक्रधर शेळके यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपाठावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, दिपकसुळ, स्मीताखानापूरे, समद पटेल, सुनीता आरळीकर, स्वातीजाधव,सपना किसवे, मारूतीपांडे, सुभाष घोडके, गणेश एसआर देशमुख, हकीमभाई शेख आदी उपस्थित होते.
सदरील पदयात्रा शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक येथूननिघूनहनुमान चौक, गंजगोलाई, साहित्य सम्राट अण्णाभाऊसाठे चौक या मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत शेवटी राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक याठिकाणी जाहीर सभेने पदयात्रेचा समारोप करण्यात आला. पावसाची संततधार सुरू
असतांनाही पदयात्रेत काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. हातात नेत्याचे फलक घेतलेले कार्यकर्ते उत्स्फुर्तपणे घोषणा देत होते. जुडेगा भारत जितेगा इंडीया, नही चलेगी तानाशाही नही चलेगी, गो बॅक गो बॅक मोदी शहा गो बॅक या घोषणांनी लातूर शहर दुमदूमून गेले होते.

यावेळी केशरबाई महापूरे, शितल फुटाणे, प्रविण् पाटील, इब्रान सय्यद,प्रविण सुर्यवंशी, प्रविण कांबळे, सुलेखा कारेपूरकर, शितल मोरे,पृथ्वीराज सिरसाट, इश्वर चांडक, पवन गायकवाड, अनिल चव्हाण, ॲड. फारूख शेख, विकास कांबळे, जयदेव मोहिते,यशपाल कांबळे, दिप्ती खंडागळे, युनुस मोमीन, अविनाश बटटेवार, दगडूअप्पा मिटकरी, ज्ञानेश्वर सागावे, इसरार
पठाण, रणधीर सुरवसे, कांवळे यांच्यासह लातूर शहर वजिल्ह्यातील काँग्रेसपक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महानगरपालिका तसेच इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,सहकारी संस्थांचे आजी माजी पदाधिकारी तसेच नागरिक, महिला भगिनी या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.