लातूर प्रतिनिधी
कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तिकरण कार्यक्रमाचे आयोजन अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नारी प्रबोधन मंच, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड येथील ग्रामपंचायत येथे दि. ३१ ऑक्टोबर ते दि. १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुमतीताई जगताप, प्रमुख वक्त्या अॅड. सुमेधा शिंदे, उपसरपंच अशोक कणसे, संस्थेच्या सहसचिव प्रा. नयन राजमाने, संस्थेच्या सदस्य शोभा वारद यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सहसचिव प्रा. नयन राजमाने यांनी केले. प्रमुख वक्ता अॅड. सुमेधा शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायद्यांची सविस्तर माहिती दिली. नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यास सांगून समस्येचे निराकरण केले. उपसरपंच अशोक कणसे यांनी दोन्ही संस्थेच्या कार्याचे कौतुक केले तसेच पुन्हा कार्यक्रमासाठी येण्याची विनंती केली.

सुमती जगताप यांनी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास पवार यांनी यांनी केले. तसेच संस्था सदस्य शोभा वारद यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी प्रारंभी नागरिकांना माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला रोहिले सर व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.