*जिल्हा बँक म्हणजे शेतकऱ्यांचा कल्पवृक्ष*

0
210

*35 वर्षात जिल्हा बँकेने सभासदांचा विश्वास संपादन केला*

 *प्रत्येक सभासदास त्यांच्या क्षेत्रानुसार पाच लाख रुपये बिन व्याजि कर्ज देणार*

*जिल्हा बँक नव्हे तर कल्पवृक्ष*

*माजी मंत्री दिलीपराव देशमुख*

लातूर दि. 9.जिल्ह्यातील शेतकरी, सोसायटी चेअरमन यांच्या हाकेला धावून गेल्या 35 वर्षात जिल्हा बँकेने लोकांचा विश्वास संपादन केला असून शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचे काम केले असून जिल्ह्यातील प्रत्येक घराला कुठल्यातरी माध्यमातुन मदत झालेली आहे असे सांगून आम्ही जे बोलतो ते करतो या गोष्टी नुसत्या बोलायच्या नसतात तर त्या आम्ही करून दाखवतो असा टोला विरोधकांना लगावत 1 दिवसात पाच लाख रुपये कर्ज देण्याची तयारी आहे त्यासाठी सातबारा जिल्ह्यातील रहिवासी असला पाहिजे असे सांगत जिल्हा बँक नव्हे तर कल्पवृक्ष आहे असे मत राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले.

ते शनिवारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक 2021 च्या पंचवार्षिक अनुषंगाने औसा व रेणापूर तालुक्यांतील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन यांच्यासोबत संवाद साधला .त्यावेळी ते बोलत होतेयावेळी व्यासपीठावर लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे माजी आमदार अँड त्रिंबक जी भिसे राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे,उपाध्यक्ष शाम भोसले, रेणा साखर उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, जिल्हा बँकेचे संचालक अँड प्रमोद जाधव संचालक सौ स्वयंप्रभा पाटील उपस्थित होते .

पुढे बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोअर बँकिंग सेवा देणारी लातूर बँक आता घरपोच गावात जाऊन लोकांना सुविधा देत आहे त्यामुळे लोकांना आधार मिळाला आहे असे सांगून जिल्हा बँकेमध्ये शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज सुविधा उपलब्ध केल्याने लोकांना ताटकळत बसायचे काम ठेवले नाही शैक्षणीक,

शुभमंगल, पिक कर्ज वाटप, बँक आपल्या दारी आदी तात्काळ सेवा देण्याचा निर्णय घेतल्याने हि बँक नव्हे तर लोकांची आधारवड कल्पवृक्ष ठरलेली आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना सुरवातीला 1 लाख रुपये कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला आम्ही त्यांच्यापुढे जावून 2 लाख रुपयांपर्यंत शून्य दराने पिक कर्ज वाटप केले आता सरकारने 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली आम्ही पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने पिक कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला सरकारची कुठलीही वाट न बघता सर्वात अगोदर निर्णय आम्ही घेतला आता आमचे अनुकरण इतर जिल्ह्यांतील बँका करत आहे हे सर्व करीत असताना बँकेत कधीही राजकारण केले नाही समाजकारण सर्वांना आर्थिक मदत करण्याचे धोरण स्वीकारले अगदी विरोधक असले तरी त्यांना मदत केली मागच्या काळात माजी आमदार दिनकर माने चेअरमन असताना मारुती महाराज साखर कारखान्या स मदत केली जिल्ह्यातील जयजवान, डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना, प्रियदर्शनी साखर कारखान्यास सुद्धा मदत केली आहे हे आमचे धोरण राहीलेले असून जिल्ह्यातील मांजरा विलास,रेणा , मारूती महाराज साखर कारखान्यास सहकार्य केले आहे माञ तेही नियमात बसून आमचे कोणीही जवळचे असतील तर त्यांना सुधा चुकीच्या पद्धतीने कर्ज दिले नाही हा विश्वास आम्ही मागच्या 35 वर्षात जिल्ह्यांतील सर्व सोसायटीचे चेअरमन सभासद यांचा संपादन केला आहे यासाठी येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन करून जागा मर्यादित आहेत पात्र लोकांना नवे जूने करून संधी द्यावी लागणार आहे असे सांगून जिल्ह्यातील आपल्या हितचिंतक मित्र परिवार नातेवाईकांना सहकार पॅनल च्या उमेदवारां च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले

*राज्याला दिशा देणारी लातूर जिल्हा बँक*

राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अनेक धाडसी निर्णय माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या नेतृ्त्वाखाली घेतले आहे याचे अनुकरण राज्यातील इतर जिल्हा बँका घेत आहेत असे सांगून जिथे जिथे काकांचा संस्थेत स्पर्श झाला आहे त्या संस्था पारदर्शकता आणून कार्य करीत आहेत असे सांगून अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील लोक सांगतात हे काकांनी केलेले आहे त्यांच्या कार्याची गुंज आहे अनुभवाचा चांगुलपणा आहे असे म्हणत *गेट उघडणार आहे सतर्क राहा निवडणुकीच्या काळात गेट उघडणार म्हणून चुकीचे माणसं मध्ये जाणार नाहीत याची काळजी घ्या* विरोधकांना सन्मान करा सगळ काम चोख चालू आहे जिल्हा बँकेने विश्वास संपादन केला आहे उमेदवार कोण असेल असे न बघता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

कुणाचीही जप्ती न करता बँक पुनर्वसन ते थेट अव्वलस्थान दिलीपराव देशमुख यांचं नेतृत्व

यावेळी बोलताना माजी आमदार वैजनाथ शिंदे म्हणाले की एकेकाळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुनर्वसनातून बाहेर काढण्याची किमया केली माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने वसुलीसाठी कुठलीही जप्ती आणली नाही तर फक्तं एक पत्र पाठवून वसुली केली हे खरोखरच आपल भाग्य आहे हेच नेतृत्व माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब होते हे जपल पाहिजे हे तुमची आमची जबाबदारी आहे शब्द तंतोतंत पालन करणारे नेते आहेत विकासात्मक निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काकांच्या दिलीपराव देशमुख साहेब यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले

*जिल्ह्यातील सहकार चळवळीचं रदय जिल्हा बँक*

*माजी चेअरमन यशवंतराव पाटील*

देशातील सहकार क्षेत्रात पहिल्यांदा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बिन व्याजी पिक कर्ज पाच लाख रुपयांपर्यंत देण्याचा ऐतिहासिक निर्णय माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला असून या ऐतिहासिक निर्णयामुळे हजारो सभासदांना आधार मिळनार आहे सातत्याने चांगल कार्य करण्याचे धोरण स्वीकारले आहे असे सांगून लातूर जिल्हा बँकेचे बोर्ड पदाधिकारी बिनविरोध निवडून येण्याची परंपरा राहीलेली आहे चांगल नेतृत्व लाभलेलं आहे यासाठी खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

पथदर्शी निर्णय माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले

चेअरमन श्रीपतराव काकडे

यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे यांनी गेल्या सात वर्षांत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा बँकेने अनेक धाडसी पथदर्शी निर्णय घेवून शेतकरी सभासदांना मोठ्या प्रमाणावर आधार देत त्यांना कमी वेळेत अधिक सेवा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतले बिनव्याजी कर्ज, घरपोच सेवा, बँक आपल्या दारी आदी पथदर्शी निर्णय घेतले असून येणाऱ्या निवडणुकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या सूचनेनुसार जो उमेदवार जाहीर होईल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले .

यावेळी माजी आमदार अँड त्रिंबकजी भिसे, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणा चे चेअरमन सर्जेराव मोरे, संचालिका सौ स्वयं प्रभा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले

याप्रसंगी जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, संचालक संभाजी रेड्डी, चांदपाशा इनामदार, औसा, रेणापूर तालुक्यांतील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन मतदार उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रा. सचिन सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन बँकेचे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here