उदगीर (दि.16) येथील लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयाने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.१४ वर्ष वयोगाटातील मुलांचा व्हाँलीबॉल संघ जिल्ह्यात सर्वप्रथम येऊन विभागीय स्पर्धेसाठी निवडला गेला.या संघाने देवणी ,जळकोट व अंतिम सामन्यात चाकूर तालूक्याच्या संघावर मात करत एकतर्फी विजय मिळवत विभागीय स्पर्धेत पात्र ठरला. या संघात आदित्य जाधव, पृथ्वीराज घोडके, सदाशिव गव्हाणे ,संकेत चौधरी ,विश्वजीत घोडके ,सोहम टोंकाकोटे, सुजल रोटे ,प्रणव सोमवंशी, सुयश सुरवसे सागर कोडरूले,सिद्धेश्वर भुसागिरे, सिंहान इटग्याळकर या खेळाडूंचा सहभाग होता. या संघास क्रीडाशिक्षक संतोष कोले यांचे मार्गदर्शन लाभले .
या खेळाडूंच्या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर ,उपाध्यक्ष जितेशजी चापशी ,कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य ,संकुलाचे अध्यक्ष मधूकरराव वट्टमवार , कार्यवाह शंकरराव लासूणे ,शालेय समितीचे अध्यक्ष सतन्पा हुरदळे ,मुख्याध्यापक बाबूराव आडे ,उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर,लालासाहेब गुळभिले ,माधव मठवाले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.