जानाई प्रतिष्ठान पुरस्कार

0
355

डाॅक्टर-जानाईश्री पुरस्कार-
डाॅ.सचिन बालकुंदे यांना जाहीर.
• जानाई प्रतिष्ठानचा १ जुलै डाॅक्टर डे उपक्रम
लातूर..श्री जानाई प्रतिष्ठान लातूर या संस्थेचा डाॅक्टर डे निमित्त दिल्या जाणा-या ” डाॅक्टर-जानाईश्री ” पुरस्कारासाठी किल्लारी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.सचिन बालकुंदे यांची निवड करण्यात आली आहे.डाॅ.बालकुदे यांनी वैद्यकीय व सामाजीक क्षेत्रात क्षेत्रात केलेल्या नि:स्वार्थ सेवेबद्दल श्री जानाई प्रतिष्ठान संस्थेने यावर्षी त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
रू २५,०००/- रोख, मानपत्र, महावस्त्र, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.रविवार दिनांक ११ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता जानाई फंक्शन हाॅल,मित्र नगर लातूर येथे पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न होणार आहे.
डाॅ.सचिन सोमनाथ बालकुंदे यांनी लोकमान्य टिळक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सायन मुंबई.येथून वैद्यकीय पदवी प्राप्त केली तेथेच त्यांनी डीसीएच चे शिक्षण पुर्ण केले.पुढे हैद्राबाद येथुन डीएनबी अभ्यासक्रम पूर्ण केला.> दोन वर्ष दिल्लीतील नामांकित रूग्णालयात कामाचा अनुभव घेतला,• नोबेल विजेते श्री कैलास सत्यार्थ यांच्या सोबत दिल्लीमध्ये अनेक आरोग्य शिबीरात एकत्र काम केले.नागालॅंड राज्यातील अनेक जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय आरोग्य शिबीरात अनेक वेळेस सक्रीय सहभाग घेतला याबद्दल नागालॅंडच्या राज्यपालांच्या हस्ते बालकुंदे यांना गौरवण्यात आले आहे.• गौरगरीब रूग्ण,आई वडील, मातृभूमी यांची सेवा करावी ही आवड असल्यामुळे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर देशात व परदेशातील अनेक संधी नाकारत त्यांनी ग्रामीण भागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेत यश घेत कासारशिरशी या ग्रामीण गांवापासुन वैद्यकीय अधिक्षक वर्ग १ म्हणून त्यांनी रूग्णसेवा सुरू केली. सध्या ते किल्लारी येथील शासकीय ग्रामीण वैद्यकीय रूग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.● महागडी इंजेक्शन्स,सिटीस्कॅन याला फाटा देत ,अपुऱ्या रूग्ण उपयोगी साहित्य सुविधांमध्ये अनेक रुग्ण योग्य समुपदेशन, स्वतः जातीने लक्ष देत कोरोना पहिल्या लाटेत लामजाना आरोग्य केंद्राच्या कोविड सेंटर मधील पाचशेच्यावर रूग्णाना दुरूस्त केले एकही मृत्यु नाही. दुस-या कोरोना लाटेत किल्लारी येथे गंभीर आणि अतिगंभीर एक हजारच्यावर कोरोना रुग्णांवरही उपचार मृत्यूदर एक टक्क्यापेक्षाही कमी. ● विपरीत परिस्थितीमध्ये आणि अपुऱ्या सुविधांमध्ये उत्तम रुग्णसेवा देणारे डॉक्टर म्हणून डॉ सचिन बालकुंदे यांची ओळख आहे
आपण या पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री जानाई प्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष डाॅ. वैशाली टेकाळे,कार्याध्यक्ष अभियंता श्रीकांत हिरेमठ,सचिव दत्तात्र्येय मुंढे व जानाई विद्यार्थी मंडळ अध्यक्ष समर्थ कुलकर्णी यांनी केले आहे.कार्यक्रमाच्या यशस्विते साठी अतुल ठोंबरे, संजय प्र अयाचीत, अर्किटेक्ट विजय सहदेव, डाॅ.अभिजीत मुगळीकर,राजेश मित्तल, पंकज तेरकर,महेश औरादे, डाॅ.ऋजुता अयाचित, जानाई महिलापत संस्थेच्या सौ.पुजा कांबळे , श्री.गुरूजी आय टी आय चे भूषण दाते, सुनिल बोकील.जानाई बचतगट अध्यक्ष अमोल तांदळे विशेष प्रयत्न करत आहेत.

अतुल ठोंबरे

अर्किटेक्ट,इंजिनियर,व्हॅल्युअर मित्र नगर, लातूर.मोबा.9422071641

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here