जानाईचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम प्रेरणादायी – सुधाकरराव कुलकर्णी.
लातूर :
जानाईचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम प्रेरणादायी असे उदगार सुधाकर कुलकर्णी यांनी श्री जानाई प्रतिष्ठाने श्री गुरूजी पतसंस्था प्रांगणात आयोजीत हर घर तिरंगा उपक्रमात राष्ट्रध्वज वितरण कार्यक्रमात काढले. यावेळी अर्थवर्धिनी पतसंस्था अध्यक्षा सौ.गीता ठोंबरे, सचिव सौ.संपदा दाते, श्री गुरूजी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री अतुल ठोंबरे, अर्कि.विजय सहदेव, श्री मनोज सप्तर्षी, श्री गुरूजी आयटीआय चे श्री महेश औरादे, श्री रविकांत मार्कंडेय यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात हर घर तिरंगा उपक्रमात श्री जानाई प्रतिष्ठान, अर्थवर्धिनी महिला पतसंस्था, श्री गुरूजी आयटीआयच्या सर्व कर्मचारी व संचालकांना यावेळी रा.स्व.संघ सामाजीक सदभावना आयाम देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री सुधाकरराव कुलकर्णी यांच्या हस्ते तिरंगा राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले.
व्हीडीओ पहाण्यासाठी क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇
कार्यक्रमाच्या सुरवातीला सुधाकर कुलकर्णी यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे व राष्ट्रध्वजाचे पूजन करून उपस्थितांना यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले. संपूर्ण सामुहीक वंदेमातरम नंतर भातमातेच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला सुनिल बोकील, दिपक कोटलवार, बाळासाहेब चाकुरकर सर, पी.व्ही.देशमुखसर, निशिकांत अंधोरीकर, विभा बोकील, निलिमा अंधोरीकर, अनुपमा पाटील, मनिषा वैद्य , केशव शिंदे, रोहिणी मुढे तसेच तीनही संस्थेतील सर्व कर्मचारी, सभासद यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरव्यस्थावस्थापक श्री संजय कुलकर्णी, व्यवस्थापीका सौ.अमृता देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.