जागृती शुगर कारखान्याने १८० दिवसात ७ लाख मेट्रिक टन उसाचे केले विक्रमी गाळप
३ कोटी १७ लाख ३ हजार ४०० युनिट वीज निर्मिती करून निर्यात केली
देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा, जळकोट, उदगीर या पाच तालुक्यातील उसाचे गाळप पूर्ण
लातूर दि. ९.
राज्यातील खाजगी क्षेत्रात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती साखर कारखान्याने २०२१- २२ च्या चालु गळीत हंगामात १८० दिवसात गाळप क्षमतेपेक्षा अधिक वेगाने उस गाळप करित तब्बल ७ लाख ६४० मेट्रिक टन उस गाळप केले असून त्यातून ७ लाख ३२ हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले तर ३ कोटी १७ लाख ३ हजार ४०० विजेची युनिट विजेची निर्मिती करुण निर्यात केली आहे चालु हंगामात जागृती शुगर ने उसाचे विक्रमी गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे दरम्यान कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रिक टन दैनंदिन असताना चालु हंगामात ३९०० मेट्रिक टन क्षमतेने कारखाना चालवत यावर्षी कमी दिवसांत जास्त विक्रमी गाळप करून जागृती ने नवा पॅटर्न निर्माण केला आहे.
जागृती ने नवा पॅटर्न निर्माण केला
माजी मंत्री सहकार महर्षी जागृती शुगर चे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली साखर कारखाना सुरू असुन या कामकाजात कारखान्याच्या अध्यक्षा सौ गौरवी अतुल भोसले (देशमुख) उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांची खंबीर साथ यामुळे जागृती शुगर साखर कारखान्याने सुरवातीपासून आजतागायत सर्व गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडले आहेत चालु हंगामात कमी दिवसांत जास्त विक्रमी गाळप करून विज निर्मिती मोठया प्रमाणावर निर्यात केली आहे लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जागृती शुगर कार्यक्षेत्रात मोठया प्रमाणावर सिंचन व्यवस्था निर्माण केल्याने मुबलक पाणी पुरवठा आहे या भागात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली असून कारखाना प्रशासनाने नियोजन करून ऊस गाळप करण्याचा प्रयत्न केला आहे हंगामात अजूनही गाळप सुरू असल्याची माहिती जागृती शुगर चे प्रकल्प व्यवस्थापक सुनिल कुमार देशमुख यांनी सांगितले
पाच तालुक्यातील सभासद बिगर सभासदांचे ऊसाचे गाळप पूर्ण
लक्ष्मणराव मोरे यांची माहिती
जागृती शुगर ने चालु हंगामात कार्यक्षेत्रात येणाऱ्या देवणी शिरूर अनंतपाळ निलंगा जळकोट उदगीर या पाच तालुक्यांतील उस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाचे गाळप पूर्ण केले असून यापुढे मांजरा साखर कार खाण्याच्या कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्यासाठी जागृती शुगर ने तयारी सुरू केली असून त्यादृष्टीने कारखाना स्तरावर यंत्रणा कामाला लागलेली आहे अशी माहिती जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी यावेळी सांगितले.
कारखाना प्रशासनाचे अध्यक्षा सौ गौरवी देशमुख भोसले यांच्या कडून कौतुक
यावर्षी चालू हंगामात विक्रमी उस गाळप केल्याबद्दल कारखान्याच्या अध्यक्षा सौ गौरवी अतुल भोसले ( देशमुख) यांनी कारखान्याचे प्रशासन, सन्माननीय संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, कामगार, उसतोड ठेकेदार, उस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार यांनी परिश्रम घेतले व विक्रमी गाळप यशस्वी झाले आहे त्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे