दिन विशेष
दि. १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट हा सप्ताह जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक स्तनपान सप्ताहाच्या अनुषंगाने लातूरच्या ख्यातनाम स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. सौ. मनिषा कल्याण बरमदे यांचा स्तनपानाचे महत्व विशद करणारा लेख माध्यम वाचकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत.
– समूह संपादक
—————————
मातृत्व हे स्त्रीत्वाचे वैभव आहे . स्तनपान करणे हे आई व बाळाच्या विकासासाठी खूप महत्वाचे आहे . प्रसूतीच्या अनंत वेदना सहन करून जेव्हा आई बाळाला स्तनपान करते, तेव्हा ती तिच्या सर्व वेदना विसरते. म्हणून म्हणतात
” जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उध्दारी ‘
या वर्षीचे स्तनपान सप्ताहाचे रजा घोषवाक्य आहे
‘ स्तनपान आणि काम ‘. मातृत्वाची रजा ही कमीतकमी ६ महिने दयावी व काम करण्याऱ्या स्त्रियांची स्तनपानची सोय व्हावी, हा यामागचा मूळ उद्देश आहे.
अभिनेत्री नेहा धुपियाची काही दिवसापूर्वी एक मुलाखत प्रदर्शित करण्यात आली होती. ज्यामध्ये तिला विमानामध्ये बाळाला विमानामध्ये स्तनपान करताना अडचण आली होती. तिने सर्वत्र याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला होता. समाजात नोकरदार स्त्रियांना नोकरी करताना बाळाला घरी ठेवावे लागते, नातेवाईकाकडे सोपवावे लागते. नोकरावर विसंबून राहावे लागते. कधी कधी नोकरी व बाळ यापैकी एकाची निवड करावी लागते. आर्थिक अडचणी, भावनिक कुचंबणा, मानसिक संताप, सामाजिक अडगळ सहन करावी लागते. आईचे दूध सर्वसामान्य तापमानाला २४ तास टिकते ते दूध काढून बाळाची भूक भागविली जाऊ शकते. यासाठी अनेक शहरात ब्रेस्ट मिल्क बँक अनेक शहरात कार्यान्वित आहेत.
सन १९९१ मध्ये स्तनपानासाठी अधिक जनजागृती व्हावी यासाठी इस्पितळात बेबी फिडींग हॉस्पिटल ची संकल्पना आली.
याद्वारे :
१ . हॉस्पिटलमध्ये सर्वत्र स्तनपानाचे महत्व विशद करावे.
२ . हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांना याबाबतीत निष्णात करावे
३. गर्भवती स्त्रियांना मार्गदर्शन करावे
४ . बाळ जन्मल्यानंतर लगेच एका तासात छातीला लावावे
५. आईला स्तनपानाबद्दल मार्गदर्शन करावे
६. नवजात शिशुना आईच्या दुधाशिवाय काही देऊ नये
७. नवजात शिशु व माता यांना २४ तास एकत्र ठेवा
८. जेव्हा बाळाला भूक लागेल तेव्हा स्तनपान दया
९. बाळाला वरचे दूध बाटली देऊ नये
———————————————-
बाळाला स्तनपान सुरु करताना येणाऱ्या अडचणी
——————————————-
१. सिझर झाले असेल तर
२ . स्तनाग्रे नसतील
३. दूध जास्त नसेल
४. मानसिक आजार (बाळाला पाजवण्याची इच्छा नसेल तर )
५ . आत्मविश्वासाचा अभाव
६. बाळाला आजार (फाटलेला ओठ, फाटलेला टाळू )
लॅचिंग खूप महत्वाचे आहे
——————————
१. आईने व्यवस्थित बसावे
२. बाळाने तोंड उघडले पाहिजे
३. बाळाच्या हनुवटीचा स्पर्श स्तनाला व्हावा
४. बाळाच्या खालचा ओठ बाहेरच्या बाजूला वळलेला असावा
५ . बाळाचे डोके व मान एका रेषेत असावे
—————————–
दूध पाजवितानाच्या पद्धती
————————–
१ . Cradle Position ( पाळणा स्थिती )
अ . बाळाचे पोट आईच्या पोटाला चिकटले पाहिजे डोके व शरीर एका लाईनमध्ये
हातावर असावे
२ . Cross Cradle Position ( क्रॉस पाळणा स्थिती )
अ . बाळ खूप नाजूक असेल तर मुदतपूर्व, अकाली दिवस भरण्यापूर्वी जनमाले असेल तर असेल हातात डोक घेऊन हात खाली धरून पाजावे लागते
३.. जुळी बाळे असतील तर फूट बॉल होल्ड या पध्दतीने पाजविले
पाहिजे
४. लेड बॅक पध्दतीने बेडवर झोपून, सोफ्यावर मागे पडून पाजवता येते
५. बाजूला पडलेली स्थितीत एका अंगाला झोपून बाळाला दूध पाजवू शकतो
बाळाची ढेकर काढणे खूप आवश्यक आहे . जर बाळाने हवा जास्त घेतली तर
बाळाला गुळण्या येतात.
स्तनपान चुकीच्या पद्धतीने केले तर मातेला
१. पाठदुखी
२. स्तनांना सूज येते, स्तन लाल होतात पु तयार होऊ शकतो . गरज पडली तर
शस्त्रक्रिया लागू शकते
३ . ताप येतो
४ . बाळाला ताप येतो, बाळाचे पुरेशे पोषण होत नाही
———————————
स्तनपानाचे आई व बाळाला होणारे फायदे
——————————————–
स्तनपान करताना जे पहिले दूध येते ते पाण्यासारखे प्रथिने युक्त असते. त्यामुळे बाळाचे पोट भरते व वाढ होते. ज्यामध्ये लॅकटोज, प्रथिने, क्षार व पाणी असते. नंतर येणारे दूध हे घट्ट व स्निग्धयुक्त असते. ते बाळाच्या बौद्धिक विकासासाठी खूप गरजेचे असते. आधी एक स्तनातून पूर्ण दूध पाजवावे व नंतर दुसरे स्तनांद्वारे बाळाला दूध पाजवावे. आईचे दूध निर्जंतुक असते. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते. भविष्यात रक्तदाब, कर्करोग व दमा ह्रदयविकार होत नाही. जुलाब , उलट्या, न्यूमोनिया पासून बचाव होतो. बाळाचा बौद्धिक, मानसिक, शारीरिक विकास होतो. आईचे वजन कमी होते. अतिरिक्त रक्तस्त्राव कमी होतो. स्तनांचा कर्करोग टळतो.
गर्भनिरोधक म्हणून स्तनपान फायद्याचे ठरते. पहिल्या सहा महिन्यांपर्यंत बाळाला आईचे आणि फक्त आईचे दूध दयावे.
…. तर मग सर्वजण एकत्र येऊन जनजागृती करूयात ,स्तनपानाचे महत्व विशद करूयात ,
.. करू बाळाला सदृढ पळवू .. जुलाब, उलट्या आणि निमोनिया
करू आईला सुडोल, रोखू स्तनाचा कर्करोग
हसू बाळाच्या ओठी, तृप्तता आईच्या नेत्री
गरीब ,श्रीमंत, घरेलू, मॉंडर्न, कामवाली ,
साऱ्याजणी सहा महिन्यापर्यंत देऊ बाळाला केवळ आईचे दूध,
नको दूध पावडर ,नको गाईचे दूध ,नको बाटली
स्तनपान करू, सर्वाना करायला लावू …..

लेखन- डॉ. सौ. मनिषा कल्याण बरमदे ,
बरमदे हॉस्पिटल , लातूर.
————————————