लातूर दि. ०६– जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वनपरिक्षेत्र लातूर अंतर्गत वन परिमंडळ औसा यांच्या वतीने भादा सर्कल मधील मौजे वडजी येथील वन विभागाच्या जमिनीवर लावण्यात येणाऱ्या बारा हजार वृक्षलागवडीचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे सदस्य आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला.
वाढत्या लोकसंख्येनुसार वृक्ष लागवड गरजेचे असून वृक्ष लागवडीबरोबरच वृक्षाचे संगोपन महत्वाचे आहे ही काळाची गरज ओळखून ५ जून जागतीक पर्यावरण या निमित्ताने औसा तालुक्यातील भादा सर्कल मधील मौजे वडजी येथील सात हेक्टर वन विभागाच्या जमिनीवर लावण्यात येणाऱ्या बारा हजार रोप लागवडीचा शुभारंभ आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते करण्यात आला.

दिवसेंदिवस वातावरणात होत असलेल्या बदलामुळे विविध अपत्तींना तोंड द्यावे लागत असून निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड यांनी वृक्षारोपनाचे महत्व पटवून दिले. केवळ रोपे लावून नव्हे तर त्यांचे संगोपन तितकेच महत्वाचे आहे असे बोलून दाखविले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे, वनपरिमंडळ अधिकारी पांडूरंग चिल्ले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, वसंत करमुडे, महेंद्र गोडभरले, श्रध्दा जगताप, आरती राठोड, अनुसया फड, पद्ममाकर चिंचोलकर, महादेव मुळे, राजकिरण साठे, अक्षय भोसले, वनरक्षक गोविंद घुले, माधव मुंडे, पोलीस पाटील गोविंद पाटील, भरत पाटील, नरसिंग साळुंके, सचिन गवळी यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे यांनी वनविभागाच्या वनीकरणाबाबतची सविस्तर माहिती दिली.