16.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसामाजिक*जलसमाधी आंदोलन मागे*

*जलसमाधी आंदोलन मागे*

उपविभागीय अधिकारी यांच्या लेखी आश्वासनाणे आंदोलन मागे
निलंगा आठ तास आदिवासी महादेव कोळी समाज आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी तेरणा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करीत असताना उपविभागीय अधिकारी यांच्या लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन

मागे..

निलंगा -(प्रतिनिधी)- निलंगा तालुक्यातील निलंगा कासार सिरसी महामार्गावर असलेल्या दादगी येथील तेरणा नदीच्या पात्रात कोळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मराठवाड्यातील आदिवासीं कोळी समाजाच्या वतीने आठ तास जल समाधी आंदोलन गुरूवारी ता. एक रोजी करण्यात येणार आले. तब्बल आठ तास हे जलसमाधी आंदोलन सुरू होते. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.


आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत. ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, विनाअट आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी चे जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत. ज्या आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे. आदिवासीं संचालक कै. गोविंद गारे व मधुकर पिचड यांच्या निकशानुसार समान न्यायाने विस्तारित क्षेत्रातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. जात पडताळणी समितीच्या वतीने सुरू असलेली पुर्न तपासणी तात्काळ थांबवावी.

शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वैधताबाबत काढलेले शासन परिपत्रक रद्द करण्यात यावे. तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यानी निर्गम उतारा व पालकांची जात प्रमाणपत्र या पुराव्यावरून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. अशा विविध मागण्यांसह आदिवासी कोळी समाजाच्या विरोधात असलेल्या सरकारचा धिक्कार असो अशा विविध घोषणाबाजी करत दादगी येथील तेरणा नदीच्या पात्रात तालुक्यातील हजारोंच्या संख्येने महिला पुरुष आदिवासी कोळी समाज बांधव या जलसमाधी आंदोलनात सहभागी झाले होते. यामध्ये दोन आंदोलन कर्ते गंभीर जखमी झाले असून दोघांनाही पुढील उपचारासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून कोळी महादेव समाजाचे आंदोलक नदीपात्रात उतरून आंदोलन सुरू केले. यावेळी जोपर्यंत आम्हाला लेखी अश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही मगे हटणार नाही असा पवित्रा आंदोलन कर्त्यांनी घेतला होता. अखेर उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसिलदार प्रसाद कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांनी आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली मात्र लेखी अश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यामध्येच
या आंदोलन स्थळी भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी उपस्थित राहून कोळी समाजाच्या मागण्या शासन दरबारी मांडू उप विभागीय अधिकारी यांना जातीचे प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावे अन्यथा मीषया समाजासोबत आहे. कोणत्या पक्षाचा नेता म्हणून नव्हे तर एक नागरीक म्हणून तुमच्या सोबत असेन शिवाय मराठवाड्यातील जातीचे प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्राबाबता लवकरच मुख्यमंत्र्याना बोलून लवकरच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे अश्वासन त्यांनी यावेळी दिले. काँग्रेसचे सचिव अभय सोळूंके यांनीही या आंदोलनाला भेट देवून पाठींबा दिला. उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नायबतहसीलदार प्रविण आळंदकर यांनी निवेदन स्विकारून लेखी अश्वासन दिले. यावेळी पोलीसांनी मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता. ग्रामीण भागातील महीला, युवक शालेय विध्यार्थी, जेष्ठ नागरीक, हातामध्ये झेंडे घेऊन डोक्यावर टोप्या घालून आंदोलनात सहभागी झाले होता. या आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये म्हणून अँब्युलन्स, अग्नीशामन दल, एनडीआरएफ पथक, पोलिस अधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनेक शालेय विध्यार्थांनी जात वैधता मिळत नसल्याने कशा अडचणी येतात, प्रत्येकांचे जात प्रमाणपत्र अवैध केले जाते त्यांना उच्च न्यायालयत दाद मागावी लागते अशा व्यथा मांडल्या. हजारो कोळी महादेव समाज या आंदोलनात सहभागी झाला होता.
……..

दोघांची प्रकृती चिंतजनक
या आंदोलना दरम्यान चार ते पाच समाज बांधव बुडत होते त्यांना समाजाचे पोहणारे व एनडीआरएफच्या टिमने बाहेर काढले त्यातील दोघांना निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आसून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
……

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे बुडवले बॕनर
..
आमच्या समाजाला न्याय द्या अनेक वर्षापासून हा प्रश्न आदिवासी आमदाराच्या दबापोटी सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे फोटोचे बॕनर पाण्यात बुडवून निषेध व्यक्त केला.
……..
आठ दिवसात प्रश्न नाही सुटल्यास पुन्हा आंदोलन तिव्र करणार : चंद्रहंस नलमले
…..
आम्हाला जातीचे दाखले तत्काळ देवू म्हणून उपजिल्हाधिकारी यांनी लेखी अश्वासन दिले आहे. त्यामुळे तात्पुरते आंदोलन स्थगित केले असून जातपडताळणीसाठी मुख्यमंत्र्यानी आदीवासी विभागाची बैठक लावून रक्त नात्याचा शासन परिपत्रक काढावे, कोळी हेच महादेव कोळी, मल्हार कोळी आहेत हे मान्य करावे अन्यथा आणखी तिव्र आंदोलन करू असा इशारा सकल आदिवासी कोळी महादेव , कोळी मल्हार समाजाचे नेते यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]