27.2 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeसामाजिक*जललक्ष्मी करेल येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार-निलंगेकर*

*जललक्ष्मी करेल येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार-निलंगेकर*

  • आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे प्रतिपादन
  • उदगीर/प्रतिनिधी:जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जी जललक्ष्मी आपल्याला प्राप्त होणार आहे त्या माध्यमातून येणाऱ्या कित्येक पिढ्यांचा उद्धार होईल,असे प्रतिपादन आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
    महालक्ष्मीचा सण असतानाही जलसाक्षरता अभियानात असंख्य नागरिक,महिला व तरूण सहभागी झाले.हे जलयोद्धे उदगीर येथून पिंपरी,नळगीर,घोणसी,कोळनूरचौक,पाटोदा,जळकोट,हडोळती,
  • शिरुरताजबंदआणित्यानंतरअहमदपूर,चापोली,चाकूर,घरणी,आष्टा
  • मोड,खरोळा,व रेणापूर या गावात दुचाकी रॅलीच्या माध्यमातून पोहोचले.
    त्या-त्या ठिकाणी संवाद साधताना आ.निलंगेकर बोलत होते.माजी मंत्री बाळासाहेब जाधव,प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके,जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, पंचायत समिती माजी सभापती अयोध्या केंद्रे,अशोक केंद्रे, चाकुरचे नगराध्यक्ष कपिल माकणे, यांच्यासह ठिकठिकाणी स्थानिक नेते,लोकप्रतिनिधी त्यांच्या समवेत होते.

  • आ.निलंगेकर यांनी सांगितले की,सातत्याने कमी होणाऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला आहे.पाणीटंचाई नेहमीचीच असल्याने या परिसरात पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.त्यामुळे मराठवाड्याची टँकरवाडा अशी ओळख झाली असून ती पुसून काढण्यासाठी जलसाक्षरता अभियानाला आपली साथ हवी आहे.

  • मराठवाड्याच्या अनेक भागात वर्षभर टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागतो.कायमस्वरूपी पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे त्या भागात नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते.आपला लातूर जिल्हाही त्याला अपवाद नाही.अशा स्थितीत आपण पाण्याबाबत स्वयंपूर्ण असणे गरजेचे आहे.पाण्याशिवाय विकासाचे महाद्वार उघडणार नाही.त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी आणि टँकरवाडा म्हणून निर्माण झालेली ओळख पुसून काढत सुजलाम सुफलाम मराठवाडा ही ओळख निर्माण करण्यासाठी जलसाक्षरता अभियानास पाठिंबा द्यावा,असे आवाहन त्यांनी केले.
    समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देताना ते मांजरा व तेरणा खोऱ्यात सोडावे,अशी आपली मागणी आहे.ही मागणी पूर्ण झाली तर जललक्ष्मी आपल्या शिवारात व दारात येणार आहे.आगामी कित्येक पिढ्यांना याचा फायदा होणार असून त्या पिढ्यांचा पाण्यामुळे उद्धारच होईल,असेही आ.निलंगेकर म्हणाले.


हक्क मागताना कर्तव्यालाही प्राधान्य द्या… ,
स्वतःच्या हक्काबाबत आपण नेहमीच जागरूक असतो.जे मिळत नाही ते भांडून मिळवतो.आता पाण्याबाबतही तेच करावे लागत आहे.परंतु हक्कासाठी भांडताना कर्तव्याची जाणीव असली पाहिजे.पाणी आपण मिळवून घेऊ परंतु त्यासोबतच पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे.उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे.पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी आडवणे व जमिनीत जिरवणे हे आपले काम आहे.पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्यासाठी महत्त्वाचा आहे,याची जाणीव असली पाहिजे,असेही आ. निलंगेकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचे अभियानास पाठबळ…
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात राबविल्या जात असल्याने असणाऱ्या जलसाक्षरता अभियानास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ मिळाले.फडणवीस यांनी एका व्हिडिओद्वारे आ.
निलंगेकर यांच्या अभियानाचे कौतुक केले. ज्या उद्देशाने लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरू केला होता तो उद्देश या अभियानामुळे साध्य होत असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.निलंगेकर यांच्या या उपक्रमास जनतेने साथ द्यावी.शासन तर दुष्काळ निवारणासाठी काम करतच आहे.त्यात आपलाही सहभाग नोंदवावा,असे फडणवीस यांनी म्हटले आहे.


खरोळ्यात आ.कराड यांच्याकडून स्वागत …
ग्रामीणचे नेते आ.रमेशअप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघात खरोळा येथे जलसाक्षरता रॅलीचे स्वागत केले.भविष्यातील अडचणी लक्षात घेत आ.निलंगेकर यांनी दूरदृष्टी दाखवत जलसाक्षरता अभियान सुरू केले आहे.या अभियानास यश येणारच आहे.भविष्यात आपला मराठवाडा आणि लातूर जिल्हा सुजलाम् सुफलाम् होईल,असा आशावाद आ.रमेशअप्पा कराड यांनी व्यक्त केला.या अभियानास आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]