16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeआरोग्य वार्ताजलजन्य आणि इतर साथ रोग नियंत्रणासाठी,जिल्ह्यात आरोग्य विभाग 'अलर्ट मोडवर '

जलजन्य आणि इतर साथ रोग नियंत्रणासाठी,जिल्ह्यात आरोग्य विभाग ‘अलर्ट मोडवर ‘

लातूर दि. 28 ( विशेष वृत्त, जिमाका ) लातूर जिल्ह्यात आता कोविड रुग्ण शून्यावर आहेत पण आता पावसाळा येतो आहे. पावसाळ्यात जलजन्य साथ रोग आजार उदभवू शकतात. त्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर असून तशी मान्सून पूर्व तयारी झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही.वडगावे यांनी दिली.
जिल्ह्यातील 50 पी.एच.सी 252 आरोग्य उपकेंद्र, 7 आयुर्वेद दवाखाने, 1 युनानी दवाखाना आणि १७५
समुदाय आरोग्‍य अधिकारी जिल्ह्यात आहेत.
जिल्ह्यात पाणी दूषित होऊ नये म्हणून क्‍लोरिनेशन व क्‍लोरिनवॉश विशेष मोहिम आखण्यात आली आहे.
पावसानंतर पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या उद्भवस्‍थानांना (स्‍त्रोतांना) नविन पाणी आल्‍यास सर्व स्‍त्रोतांचे विशेष माहिमेव्‍दारे गावनिहाय, ग्रा.प.निहाय तसेच
तारीखनिहाय क्‍लोरिनेशन व क्‍लोरिनवॉश मोहिम घेतली जाणार असल्याची माहितीही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी दिली.

जलकुंभाची सफाई
ग्राम पंचायतीच्‍या सर्व जलसुरक्षा रक्षकांना ब्लिचींग पावडर नियमित वापर व साठवणूक इत्‍यादी बाबत प्रशिक्षण दिल्‍या जाणार असून 24 तास कार्यरत राहील अशा साथरोग नियत्रंण कक्षाची स्‍थापना जिल्‍हास्‍तर, तालूकास्‍तर व प्राथमिक आरोग्‍य केंद्रस्‍तरावर करण्‍यात येणार आहे. तसेच साथरोग औषधी किट सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्रस्‍तर, उपकेंद्रस्‍तरावरावर ठेवण्यात येतील येतील.


या काळात
शिघ्र कृती दलाची स्‍थापना करण्यात आली असून
जोखीमग्रस्‍त, नदीकाठच्‍या गावावर विशेष लक्ष देण्यात येणार असून आरोग्‍य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित सर्वेक्षण केले जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच. व्ही.वडगावे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]