नाशिक-
येथील नामवंत माध्यम आणि जनसंपर्क तज्ञ अभिजीत चांदे यांना बंगलोर च्या भारत विद्यापीठा तर्फे ‘ मिडिया आणि मार्केटिंग कम्युनिकेशन्स ‘ या विषयातील कार्याबाबत मानद डॉक्टरेट ने सन्मानित करण्यात आले आहे .
अभिजीत चांदे हे गेल्या ३ दशकाहून अधिक कालावधी पासून मीडिया आणि जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत आहेत . करियर च्या सुरवातीला काही नामवंत दैनिकात काम केल्यानंतर चांदे यांनी मीडिया व्यवस्थापन आणि जनसंपर्क या क्षेत्रात कार्याला सुरुवात केली .ते आजमितीला अनेक आघाडीच्या संस्थांना सेवा देत असून देशातील अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांचे मार्केटिंग सल्लागार म्हणून देखील काम बघत आहेत .
मीडिया आणि मार्केटिंग कम्युनिकेशन्स क्षेत्रात चांगले मनुष्यबळ यावे या साठी गेली अनेक वर्षे ते विविध महाविद्यालय आणि संस्थांमध्ये या विषयाचे प्रशिक्षण देखील देतात. त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले असून त्यांची निवड रोटरी तर्फे मेक्सिको मधील अभ्यास दौऱ्यासाठी देखील करण्यात आली होती .