16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeसामाजिक*जनजागृती मोर्चास लातूरकरांचा प्रचंड प्रतिसाद*

*जनजागृती मोर्चास लातूरकरांचा प्रचंड प्रतिसाद*


लातूर ( प्रतिनिधी) -लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायद्याच्या तात्काळ समस्त लातूरकरांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चात लातूरकर प्रचंड प्रतिसाद देत उतरले. आई जगदंबा मंदिर गंजगोलाई येथून सुरू झालेला हा मोर्चा जगदंबा मंदिरामध्ये मातेचे स्मरण करून सुरू करण्यात आला. गंज गोलाईला प्रदक्षिणा मारून हा मोर्चा हनुमान चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संपला.

यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या सर्व लोकांनी सदैव धर्म रक्षण व धर्मनिष्ठा राखण्याची प्रतिज्ञा घेतली. सोबतच सर्वधर्मसमभाव म्हणत असताना धर्मावर संकट जर येत असेल तर त्याचा प्रतिकार देखील आम्ही तितक्याच ताकदीने करू. तसेच लव्ह जिहाद सारख्या विषयांमध्ये बळी पडलेली आमची माता, भगिनी कधीही घरी येण्याची इच्छा तिला झाल्यास तिला वापस घेऊन आम्ही तिचे पुनर्वसन करण्यासाठी आम्ही तयार आहोत अशी प्रतिज्ञा यावेळी घेतली.



या मोर्चादरम्यान सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यापार बंद ठेवून मोर्चामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गांधी चौक, अशोक हॉटेल या भागामध्ये व्यापारी वर्गाच्या वतीने मोर्चातील लोकांसाठी पाण्याचे वाटप करण्यात आले. मोर्चाची सांगता प्रत्यक्ष श्रद्धा अभिनयातून बोलते आणि तिचे व्यथा मांडते आहे अशा माध्यमातून करण्यात आली. तसेच श्रद्धाच्या वडिलांच्या मनातील व्यक्त झालेल्या भावना लोकांसमोर प्रस्तुत करण्यात आल्या.

 मोर्चाच्या प्रामुख्याने दोन मागण्या होत्या त्या म्हणजे लव्ह जिहाद विरुद्ध कायदा झालाच पाहिजे आणि धर्मांतर विरोधी कायदा झालाच पाहिजे. तसेच अनेक घोषणा मोर्चाच्या दरम्यान देण्यात आल्या. या मोर्चाची प्रमुख मागणी लोकांनी मोर्चात सहभागी होऊन प्रकर्षाने सरकारच्या व जनतेच्या समोर मांडली.

तसेच एकता मे जान है! हिंदू देश की शान है, श्रीरामाचे आम्ही हनुमान भारतीय स्त्री आमचा अभिमान, धर्मांतरण विरोधी कायदा झालाच पाहिजे, प्रणाम आमचा आईला माता मानतो गाईला, जपूया आपली नाजूक कळी नाही जाऊ देणार लव जिहाद ची बळी आणि श्रद्धाला न्याय मिळालाच पाहिजे अशा मागण्यांचे फलक घेऊन लातूरकर मोर्चा सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]