श्री छत्रपती शाहू बँकेच्या
उदगीर शाखेचा वर्धापनदिन साजरा !
उदगीर दि.
. श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड बीड च्या उदगीर शाखेचा वर्धापनदिन कोरोनाच्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. यावेळी सुवर्णामाता देशमुख कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद बिराजदार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही देण्यात आल्या.
. बँकेच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य प्रभाकर पाटील आणि प्रा. राजेश्वर पाटील यांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज आणि बँकेचे संस्थापक, इंजि. अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुवर्णामाता देशमुख कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छाही देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी सुवर्णामाता देशमुख विद्यालयातील शिक्षक, पोस्ते पोद्दार इंग्लिश स्कूलचे सुरज पोस्ते, महादेव शेट्टे, शिवाजी क्षीरसागर व अन्य खातेदार तसेच बँकेचे हितचिंतक उपस्थित होते.
. बँकेचे व्यवस्थापक प्रवीण जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले