16.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeठळक बातम्या*चोरीच्या गुन्ह्यातील 3सराईत आरोपी अटकेत*

*चोरीच्या गुन्ह्यातील 3सराईत आरोपी अटकेत*

            

   लातूर  *दिनांक: 09/10/2023* ( वृत्तसेवा )- लातूर
  *स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, चोरीच्या गुन्ह्यातील 3 सराईत आरोपींना अटक. 2 मोटरसायकल, एक पाणबुडी मोटार, तीन मोबाईलसह 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 3 गुन्हे उघड.*

              या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री. भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अमलदारांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
             पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .
              त्याअनुषंगाने सदर पथके चोरीच्या गुन्ह्याच्या माहितीचे संकलन करून तपास करीत असताना दिनांक 07 ऑक्टोंबर 2023 रोजी संध्याकाळी पाच वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, लातूर शहरातील शास्त्रीनगर परिसरात काही व्यक्ती अगदी कमी पैशात त्यांच्याकडील मोबाईल विक्री करण्याच्या प्रयत्न करीत आहेत. अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शास्त्रीनगर येथे पोहोचून कमी किंमतीत मोबाईल विक्री करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या तीन इसमांना एक मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्यांनी त्यांचे नाव 

1) परमेश्वर निवृत्ती बोयणे, वय-20 वर्ष, राहणार शास्त्रीनगर, लातूर.

2) विशाल चंद्रकांत गुळवे, वय 19 वर्ष, राहणार इकबाल चौक, लातूर.

3) बाबा आजम पठाण, वय 19 वर्ष, राहणार शास्त्रीनगर, लातूर.

          असे असल्याचे सांगून त्यांच्या ताब्यातील मोबाईल बाबत विचारपूस करून माहिती घेतली असता सदरचे मोबाईल नमूद आरोपींनी रात्रीच्या वेळी पाच नंबर ते औसा रोड जाणारे रोडवर पाय जाणाऱ्या इसमांना मारहाण करून जबरीने चोरी केल्याचे सांगितले .
         आरोपीकडे आणखी तपास केला असता त्यांनी काही महिन्या पूर्वी पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीतून एक टीव्हीएस एक्स व पोलीस ठाणे लातूर ग्रामीण हद्दीतून पाण्याच्या पाणबुडी मोटारी चोरल्याचे कबूल केले. पोलीस  ठाण्याच्या अभिलेखाची पाहणी केली असता पोलीस ठाणे एमआयडीसी येथे लुना चोरी बाबत एक गुन्हा दाखल असून, लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये पाणबुडी मोटारी चोरी बाबतचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
           नमूद आरोपींकडून चोरीचे 3 मोबाईल, एक पाणबुडी मोटार, एक टीव्हीएस एक्सएल लुना व गुन्हे करतेवेळी वेळी वापरलेली एक मोटारसायकल असा एकूण किंमत 87 हजार रुपयाचा मुद्देमाल  नमूद आरोपींकडून हस्तगत करण्यात आला असून तीन चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.
          यातील आरोपी सराईत गुन्हेगार असून अनेक पोलीस स्टेशन मधील विविध गुन्ह्यात सहभागी आहेत.
             पुढील कार्यवाहीस्तव नमूद आरोपींना पोलीस ठाणे लातूर ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
           तसेच आणखीन एक कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाईल चोरीमध्ये दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी केलेला 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून दोन महिलाविरुद्ध  पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन करीत आहेत.
         सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात सहाय्यक फौजदार संजू भोसले,  पोलीस अमलदार रामहरी भोसले, योगेश गायकवाड, सुधीर कोळसूरे, सिद्धेश्वर जाधव, राजेश कंचे, राहुल सोनकांबळे, मनोज खोसे, नितीन कठारे, प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]