*माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व*
*आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत*
गळीत हंगामाची जय्यत तयारी*
लातूर प्रतिनिधी ३ नोव्हेंबर २०२२ :
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुखयांच्या हस्ते व माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री लातूरजिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार तथा ट्वेंटीवन शुगर कारखान्याचेसंस्थापक अध्यक्ष अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज
विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गुरुवार दि. ३ नोव्हेंबर रोजी दुपारी लातूर तालुक्यातील मळवटी येथील ट्वेंटीवन शुगर युनिट १ चेबॉयलर अग्नीप्रदीपन संपन्न झाले.
*गत हंगामात कार्यक्षेत्रातील*
*ऊसाचे प्राधान्याने गाळप*
आदरणीय विलासराव देशमुख साहेब व आदरणीय आईसाहेब वैशालीताई विलासरावदेशमुख यांच्या आर्शीवादातुन आणी माजी मंत्री, आमदार अमित विलासरावदेशमुख साहेब यांच्या नेतृत्वात उभा राहिलेल्या मळवटी येथील टवेन्टिवन
शुगर्स लि. युनीट १ चा पहिला गळीत हंगाम विक्रमी झालाअसून या हंगामातमराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र विभागात सर्वाधिक १२ लाख १८ हजारमे. टन ऊसाचे गाळप करुन १३ लाख ५२ हजार क्विंटल साखर पोत्याचे उत्पादनकेले आहे. हा हंगाम २२४ दिवस चालला. कारखाना कार्यक्षेत्रात अतिरीक्त ऊसहोता या ऊसाचे संपूर्ण गाळप करण्यात आले. पहिल्याच हंगामात कारखान्यानेकेलेल्या विक्रमी ऊस गळीताचे साखर उदयोगात मोठया प्रमाणात कौतुक करण्यातआले.
गत गळीत हंगामात ऊसाचे क्षेत्र वाढल्यामुळे शेतकऱ्याच्या संपूर्णउसाचे गाळप होईपर्यंत विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवारातील सर्वकारखान्यांनी गळीत हंगाम सुरू ठेवावेत या परीवाराच्या धोरणाप्रमाणेशेतकऱ्यांच्या अतिरिक्त उसाचे संपूर्ण गाळप गाळप होई पर्यत या
कारखान्याचा गळीत हंगाम सुरू ठेवण्यात आला होता.
*गळीत हंगामाची जय्यत तयारी*
लातूर जिल्हयासह मराठवाडयात यावर्षी देखील समाधानकारक पाऊस पडला आहे,यामुळे या हंगामामध्ये देखील मोठया प्रमाणात ऊस उपलब्ध होत आहे. यासंपूर्ण ऊसाचे वेळेवर गाळप करण्यासाठी गळीत हंगामाची जय्यत तयारी करण्यात
आली आहे, अशी माहिती ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस प्रेसिडेंट समीर सलगर यांनीदिली आहे. लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार तथा ट्वेंटीवन शुगरकारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे
आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी येणारा गळीत हंगाम यशस्वीतेसाठीशुभेच्छा दिल्या.
प्रारंभी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासरावदेशमुख यांच्या हस्ते कारखाना परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळीट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, व्हाईस प्रेसिडेंट समीर
सलगर, जितेंद्र स्वामी, विपिन देशमुख, गोविंद देशमुख शेतकी अधिकारी सुभाषकल्याणकर आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
—