लातूर : दि. 17 जुलै 2024 (वृत्तसेवा )-आषाढी एकादशी निमित्त लातूर अर्बन बँकेच्या वतीने काढण्यात आलेल्या आषाढी एकादशीच्या चिमुकल्यांच्या दिंडीने लातूरकरांचे लक्ष वेधले .बँकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बँकेचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाऊ राठी यांच्या संकल्पनेतून असे नाविन्यपूर्ण उपक्रम लातूरकरांना नेहमीच पाहावयास मिळतात त्याचा प्रत्यय आज लातूरकरांना आला .याचे सर्वत्र कौतुक होत आहे. एकादशी सोहळा व चिमुकल्याची दिंडी उत्साहात संपन्न.

लातूर अर्बन बँकेच्या वतीने आयोजित आषाढी एकादशी महोत्सव आज उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याची सुरुवात बँकेच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेल्या रिंगण महोत्सवाने सुरू झाली .यामध्ये प्रतिकात्मक रिंगण सोहळा विविध शाळांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या विविध शाळांच्या समूहाने दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता. यानंतर ही दिंडी अष्टविनायक मंदिर येथे पोहोचली व तिचे स्वागत त्या ठिकाणी करण्यात आले. दिंडीमध्ये वेशभूषा केलेल्या सर्व शाळांच्या विठ्ठल व रुक्मिणीचे पूजन करून त्यांची महाआरती देखील या ठिकाणी करण्यात आली.
सात वर्षाच्या खालील व सात वर्षाच्या वरील वयोगटातील उत्कृष्ट पथसंचलन करणाऱ्या तसेच उत्कृष्ट अभिनय-नृत्य करणाऱ्या शाळेच्या समूहाची स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यात या सोहळ्याप्रसंगी या स्पर्धेतील स्पर्धकांचीही परीक्षकांमार्फत निवड करण्यात आली. त्या आठ समूहांना या सोहळ्यात पारितोषिक देऊन गौरवीत करण्यात आले.

या सोहळ्यात शाळांनी त्यांच्या समूहाचे विविध नृत्यद्वारे व अभिनयाद्वारे उपस्थित भाविक भक्तांची मने जिंकली. लातूर अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जी राठी साहेब तसेच बँकेच्या विविध संचालकांच्या व प्रतिष्ठित मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत सदरील सर्व कार्यक्रम संपन्न झाले . महाआरतीने यांना दिंडीची सांगता झाली.
बँकेच्या कर्मचाऱ्यांनी या दिंडीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.