महाराष्ट्राची रणरागिणी चित्राताई वाघ यांच्या
उपस्थितीत लातूरात मंगळवारी महिला मेळावा
लातूर दि.०७ – महाराष्ट्राची रणरागिणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मा. चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि १० जानेवारी २०२३ रोजी लातूर येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती रेखाताई तरडे आणि सौ. मीनाताई भोसले यांनी दिली.
महिलांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या आणि न्याय मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या रणरागिणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा मा. चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या महिला मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यू पवार, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, प्रदेश चिटणीस अरविंद पाटील, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, बांबू लागवड सल्लागार समितीचे सदस्य माजी आमदार पाशा पटेल, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सदरील महिला मेळावा लातूर येथील स्वानंद मंगल कार्यालय, रिंग रोड राजीव गांधी चौक येथे १० जानेवारी मंगळवार रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला असून या महिला मेळाव्यास जिल्हाभरातील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व जिल्हा, तालुका, शहर महिला पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्ते भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा महिला मोर्चाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा श्रीमती रेखाताई तरडे आणि शहर जिल्हाध्यक्षा मीनाताई भोसले यांनी केले आहे.