आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चिञकार पराग बोरसे यांच्या चिञाची चीनमध्ये निवड..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-कर्जत येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चिञकार पराग बोरसे यांच्या एका चिञाची निवड चीनमध्ये होणार्या चिञ प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे.जगातील नामांकित 50 चिञकारांच्या चिञांच्या प्रदर्शनात सहभाग आहे.अमेरिकेत सलग दोन वर्ष चिञप्रदर्शनात सहभागी झालेल्या पराग बोरसे या मराठमोळ्या चिञकाराच्या चिञांना चीनमध्ये बोलावून घेतल्याने त्यांच्या चिञांची भुरळ पडणार आहे.
चीनमधील पहिल्या किंग लियन 2021 पेस्टल प्रदर्शन आणि 7 व्या झुहाई शुतोंग स्टुडिओ पेस्टल आमंञित प्रदर्शनासाठी जगभरातून 23 आंतरराष्ट्रीय चिञकारांना आमंञित करण्यात आले आहे.भारतातून आमंञित केले गेलेले पराग बोरसे हे एकमेव चिञकार आहेत.प्रदर्शनात 55 चीनमधील चिञकार आणि 23 आंतरराष्ट्रीय चिञकारांचा समावेश आहे.प्रदर्शन लियन यीकिंग पेस्टल गॅलरी आँफ फोकआर्ट सेंटर,वांझाई सिटी,झुहाई,चायना इथे 20 डिसेबरपर्यंत सुरू आहे.पराग बोरसे यांचे शोल्डरिंग द लव हे व्यक्तिचिञण मांडले आहे.शेळीच्या पिल्लाला आपल्या मुला-बाळांप्रमाणे खांद्यावर खेळणार्या एका वृृध्द धनगराचे हे चिञ आहे.या माणसाच्या चेहर्यावरील स्मितहास्य आणि डोळ्यांमधील वात्सल्यपूर्ण भाव हे चिञाचे वैशिष्ट्य आहे.
पराग बोरसे याच चिञाला यापूर्वीही पेस्टल जनरल अमेरिका या मॅगझिनने व्यक्तिचिञणासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.बोरसे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.या प्रदर्शनाची चीनमधील प्रसारमाध्यमांवर झळकलेली बातमी येथे शेअर केली आहे.