; बाजार समितीतील सर्व घटकांच्या वतीने चाकरवाडी अखंड हरिनाम सप्ताहास दोन ट्रक धान्य
विविध मान्यवर व व्यापार्यांच्या उपस्थितीत झेंडा दाखविला
लातूर/प्रतिनिधी ः- गत वीस वर्षापासून लातूर बाजार समितीतील सर्व घटकांच्या वतीने चाकरवाडी येथे पार पडणार्या अखंड हरिनाम सप्ताहास अन्न-धान्य सेवा करण्यात येते. याही वर्षी सर्व घटकांच्या वतीने दोन ट्रक धान्य चाकरवाडी येथे विविध मान्यवर व व्यापार्यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आले आहे. यावेळी उपस्थितांनी ट्रकला झेंडा दाखवून या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.
लातूर बाजार समितीतील सर्वच घटक विविध माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करीत असतात. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांसाठी या घटकांच्या वतीने मदतीचा ओघ सुरुच असतो. गत वीस वर्षापासून बीड जिल्ह्यातील चाकरवाडी येथे पार पडणार्या अखंड हरिनाम सप्ताहास अन्न-धान्य सेवा बाजार समितीतील सर्व घटकांच्या वतीने करण्यात येत आहे.
यावर्षी या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झालेली आहे. याची महासांगता दि. 14 जून रोजी होणार आहे. यानिमित्ताने याठिकाणी महापंगतीचे आयोजन करण्यात येत आहे. याकरीता बाजार समितीतील सर्व घटकांच्या वतीने याहीवर्षी तब्बल आठ लाख रुपयांचे अन्न-धान्य साहित्य देण्यात आलेले आहे. सदर साहित्य दोन ट्रकच्या माध्यमातून आज दि. 9 जून रोजी सकाळी 10 वाजता चाकरवाडीकडे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून रवाना करण्यात आले आहे.
याप्रसंगी बालाप्रसाद बिदादा यांनी गत वीस वर्षापासून बाजार समितीने सुरु केलेली ही परंपरा जोपासण्याचे काम करण्यात येत असून यासाठी आपण निमित्तमात्र आहोत. याकरीता बाजार समितीतील सर्व घटक सहकार्य करीत असल्याबद्दल त्याचे धन्यवाद बिदादा यांनी मानले. याप्रसंगी माजी आ. वैजीनाथ शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती ललीतकुमार शहा, बालाप्रसाद बिदादा, अशोक (गट्टूसेठ) अग्रवाल, बाजार समितीचे सचिव दुधाटे, हुकुमचंद कलंत्री, सत्यनारायण सोनी, ओमप्रकाश डागा, तुळशीराम गंभीरे, सुधीर गोजमगुंडे, अशोक लोया, विक्रम शिंदे, रामविलास लोया, आनंद मालू, अमर पवार, दिनकर मोरे, अजय दुडीले, हर्षवर्धन सवई, पांडुरंग कोचळ्ळा, उत्तम मोहिते, सुरेश धानुरे, नेताजी जाधव, शिवाजी कांबळे, सतीष भोसले, संजय माने, लखन साबळे, नागेश वाघमारे, आदींसह बाजार समितीतील सर्व घटकांची मोठ्या संख्येने उपस्थितीती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन अशोक (गट्टूसेठ) अग्रवाल यांनी केले.
छायाचित्र शाम भट्टड