शुभ वार्ता
आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपली पारंपरिक जीवन पद्धती विसरत चाललोय.भारतीय आहार,विहार म्हणजे जणू कमीपणाचे लक्षण समजू लागलो आहोत.
नैसर्गिक बाबींवर आपण कृत्रिम बाबींनी मात करण्याचा प्रयत्न करत आहोत.पैसा हेच,आणखी पैसा,अधिकाधिक सुख सुविधा याच्या नादी लागून आपल्या हाताने आपणच आपलं आरोग्य बिघडवून घेत आहोत.त्यामुळे अन्न हे औषधासारखे घ्यावे लागते तर औषधे ही अन्नासारखी घ्यावी लागतात. यातूनच काही वेळा अकाली मरण सुद्धा ओढवतो.
अशी ही सर्व परिस्थिती पाहून तसेच
स्वतःची तीव्र पाठदुखी आणि अस्थमा यामुळे त्रासलेले डॉ नारायण राव ,एम बी बी एस,
एम डी, मधुमेह व हृदय रोग तज्ञ यांनी योगाचा आणि सुयोग्य जीवनपद्धतीचा सहारा घेतला.यामुळे ते स्वतः रोगमुक्त तर झालेच पण
आपल्याला झालेला फायदा सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी वसा घेतला. यातूनच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन डॉक्सिफिकेशन या संस्थेची स्थापना झाली.
या संस्थेमार्फत ७ दिवसांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येते.गेल्या १४ वर्षाच्या काळात १० हजाराहून अधिक जणांनी याचा फायदा घेतला आहे.यात १० वर्षें वयाच्या बालकांपासून तर ८० वर्षें वयापर्यंत च्या व्यक्तींचा समावेश आहे. तसेच उपचार घेणाऱ्यांमध्ये ५०% महिला आहेत.
मुख्य म्हणजे महिलांनी या कार्यशाळेत उपस्थिती लावण्याकडे डॉ राव यांचा अधिक भर असतो.कारण त्यांचे असे सांगते की बहुतेक आजार हे आपल्या चुकीच्या खाण्यामुळे शरीरात प्रवेश करतात.
म्हणून जर एक महिला योग्य आहार करायला शिकली तर ती त्याचा उपयोग माहेर, सासर आणि विशेष म्हणजे भावी पिढीसाठी करून देईल.
आजपर्यंत हजारो जणांनी फायदा घेतलेल्या या कार्यशाळेत सहभागी झालेले कोकण विकास परिषदेचे अध्यक्ष श्री संजय यादवराव यांचे या कार्यशाळेविषयीचे अनुभव त्यांच्याच शब्दांत पुढे देत आहे.
“गेले 7 दिवस Hydraulic Power Detoxification या इंग्रजीत जड नाव असलेल्या उपचार पद्धतीच्या शिबिरात सहभागी झालो. कोणतेही औषध नाही,
वेगवेगळ्या मशीनच्या भरपूर बिलाच्या चाचण्या नाहीत,वजन कमी करण्यासाठी चित्र विचित्र supplements नाहीत, मार्केटिंगचा फंडा नाही, डायेटिंगचे फॅड नाही फक्त पाणी, पाणी आणि पाणी !
बाबा रामदेवांची 2 चूर्ण आणि भरपूर पाणी यातून miracle !
7 दिवसात वजन 6 किलो कमी झाले. शरीर प्रचंड हलके झाले. गती वाढली . पोट आणि शरीर सर्व बाजूंनी कमी व्हायला सुरुवात झाली. 10 वर्षांनी वय कमी झाल्याचा आत्मविश्वास आला !
धन्यवाद डॉक्टर नारायणराव !
आश्चर्य म्हणजे हे Allopathy चे Gold madalist MD डॉक्टर आहेत. पण भरपूर आजारांची जड नावे, त्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट, व भरपुर पैसे कमावणाऱ्या आधुनिक उपचार पद्धती न सांगता हा भला माणूस भारतीय आयुर्वेद आणि योगाचा प्रचार करतो आहे . भारतीय जीवन पद्धती, नेहमी ताजे अन्न खा, दिवसातून केवळ 2 वेळा भोजन, सूर्यास्तापूर्वी डिनर, पोटापूरते (फक्त 2 मुठी) जेवण, थोडासा योगा अशी अतिशय सोपी उपचार पद्धती डॉक्टर साहेब सांगतात.
दररोज वॉटर थेरेपी, कोणत्याही औषध, मशीन शिवाय केवळ पाण्याच्या मदतीने संपूर्ण शरीर Total Detoxification
आतून स्वच्छ करणे, दररोजच्या शिबिरात शरीर शास्त्राची पूर्ण माहिती देऊन सतत खाणे, गरजेपेक्षा जास्त खाणे, चमचमीत, गोड, तेलकट खाऊन शरीरावर व पचन शक्तीवर अत्याचार करणाऱ्या आपल्या वाईट सवयी बदलणे हे काम डॉक्टर आपल्या प्रबोधनातून सहज करतात.
सतत सात दिवस हा मारा केल्यामुळे व हे पटल्यामुळे सवयी सहजपणे बदलायला आपसूकच सुरुवात होते. गेली 30 वर्षे सततचा प्रवास, वेळी अवेळी जेवण, मिळेल तिथे मिळेल ते खाणे, अर्थात कोकणात फिरत असल्यामुळे जगातील सर्वात रुचकर, त्यामुळे कधी कधी मनसोक्त मासे आणि भोजन यामुळे मी शरीरावर प्रचंड अन्याय करीत होतो व मला त्याची जाणीव सुद्धा होत नव्हती.
सुदैवाने व परमेश्वराचे आशीर्वाद मला मिळाल्यामुळे मी गेली 40 वर्षे एकदाही डॉक्टर कडे गेलो नाही. कोणतेही उपचार, हेल्थ टेस्ट केल्या नाहीत.मात्र गेली 3/4 वर्षे याचे परिणाम शरीरावर दिसू लागले होते. पन्नाशी नंतर सुरू होणारे डाय बेटीस, ब्लड प्रेशर यासारखे आजार आपल्याला पण सुरू होतील, Cardiac टेस्ट्स, Complete बॉडी चेकअप करावे लागेल असे सल्ले मित्र मंडळी देत होती.
कधीच डॉक्टर कडे न जाणारा मी या सगळ्यांची मला काळजी वाटत होती. पण सुदैवाने देवदूत सारखे डॉक्टर राव माझ्या आयुष्यात आले व संपूर्ण आरोग्यदायी औषधाचा मूलमंत्र मला मिळाला !
रोगांवर उपचार करण्यापेक्षा ते होऊच नये असा विचार भारतीय जीवन पद्धती देते. साधे खा, नैसर्गिक खा आणि शक्य तेवढे नैसर्गिक रहा. बरंचसं मी करत होतो आणि खूप काही करायचे आहे असा निश्चय करून नियमित जीवनाचा माझा नवीन प्रवास सुरू झाला.
मला माझ्या ध्येयाकडे 10 पट अधिक वेगाने जाण्याची संधी आणि आरोग्य मंत्र डॉक्टर नारायण राव या देवदूताने दिले.
आधुनिक उपचार पद्धती पासून चार हात दूर रहाणारा मी, मला वाटणारे सर्वात मोठे कोडे आणि चेलेंज आज सोपे झाले याकरिता मी प्रचंड आनंदी आहे !
कोणताही बडेजाव व मार्केटिंग न करता अतिशय साधेपणाने अनेकांची आयुष्य बदलणारे डॉक्टर नारायण राव व Indian Institute of Research in Detoxification या आपल्या संस्थेच्या कार्याला सलाम व मनःपूर्वक शुभेच्छा.
–संजय यादवराव
समृद्ध कोकण !
डॉ राव यांच्या कार्यात योग प्रशिक्षक श्री श्रीकांत बर्वे, तांत्रिक सल्लागार श्री दिनेश पिंटो,सुदर्शन,अमित सावंत,योगिता,कल्याणी अशी सर्व टीम त्यांना तळमळीने सहकार्य करीत असते.
खरोखरच डॉ राव यांनी हाती घेतलेले कार्य इतके महान आहे की, यातूनच बलशाली भारत होण्यासाठी एक चळवळ उभी राहिली पाहिजे.
डॉ राव यांना,त्यांच्या सर्व टीम ला भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐
–लेखन:देवेंद्र भुजबळ
9869484800