नाथसंस्थानच्या वार्षिक श्रावणमास
अनुष्ठानाची भक्ती उत्साहात सांगता
………………………………………
औसा. दि.:४.सप्टेंबर.( अँड.शामराव कुलकर्णी यांजकडून)-
……………………………………….
अबिर गुलाल उधळीत रंग , नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग……. विठ्ठलाच्या, सद्गुरूंच्या नामघोषात अबीर, गुलाल, बुक्का ,पुष्प पाकळ्या यांच्या मुक्त उधळण करीत नाथ संस्थानच्या सभागृहात पिठाधीपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात ह भ प श्री ज्ञानराज महाराज माऊली यांच्या चक्रीभजनाने प्रवचनाने व गोपाळकाल्याने यंदाच्या श्रावणानुष्ठानाची अत्यंत भक्ती उत्साहात सांगता झाली.श्रावण आरंभी पासून नाथ मंदिरात हभप ज्ञानराज महाराज यांचे नित्य सायंकाळची चक्रीभजन प्रवचनाची सेवा अत्यंत भक्ती भावात शिष्य समुदायांच्या सहभागात संपन्न झाली

आज सांगता दिनीही पहाटे काकडा विष्णुसहस्रनाम स्वयंभू विठ्ठलाची आणि पावन सद्गुरू समाधीची महापूजा रुद्राभिषेक त्यानंतर आरती नैवेद्य व महाप्रसाद पंगती झाल्या दुपारी माळी गल्ली व मानाचे नित्यनेमाचे पुरुष बैठकी भजन संस्थांनच्या प्रसिद्ध मान्यवर गायकांच्या साथीने संपन्न झाले

अबीर बुक्क्याचे चक्रीभजन
…………………………….
काल मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९ दरम्यान
ह भ प ज्ञानराज महाराज माऊली यांनी नाथसभागृहात सांगता दिनाची प्रासादिक चक्रीभजनाची व प्रवचनाची सेवा रुजू केली. यावेळी शेकडो टाळकरी झांज याच्या तालबद्ध आणि लयबद्ध निनादात विठ्ठलाच्या नाम घोषात सद्गुरू परंपरेच्या जय घोषात अबीर बुक्का गुलाल पुष्प पाकळ्यांच्या उधळणीसह चक्रीभजन मोठ्या भक्ती उत्साहात संपन्न झाले क्षणभर आपले देहभान सुरू उपस्थित सर्व श्रोते भावी भजनातील नामघोषात तल्लीन होऊन गेले.

गळ्यात पावनपरंपरेचा विणा
चक्रीभजनाची सेवा मिळणे
म्हणजे ज्ञानराजांची जन्मोजन्मीची पुण्याईच
- — गहिनीनाथ महाराज
………………………………………..
प्रासादिक चक्रीभजनाची खडतर पण पवित्र अशी सेवा ज्ञानराजांनी संपूर्ण श्रावण महिना नाथ मंदिरात अत्यंत तन्मयतेने केली या सद्गुरु पावनपरंपरेचा अधिकाराचा विणा गळ्यात आला, गुरुगादीने यांच्याकडून करून घेतली त्यांनी पंढरीची वारी केली नाथषष्ठी घडली,ही ज्ञानराजांच्या जन्मोजन्मीची पुण्याई होय त्यांनी समर्थपणे आणि श्रद्धेने ही सेवा सद्गुरु चरणी समर्पित केली याचा माझ्यासह सर्व शिष्य संप्रदायास अभिमान आहे असे गौरवोद्गार गुरु श्री गहिनीनाथ महाराज यांनी काढले.
पेठकर कसबे कर यांच्यासह सर्व वृत्तपत्रांची संपादक पत्रकार यांनी या श्रावणमास अनुष्ठानात या पवित्र अशा अनुष्ठानास भाविकांच्या भावनांचा आदर करीत भरपूर प्रसिद्धी दिली त्याबद्दल त्यांचेही श्री गहिनीनाथ महाराज यांनी धन्यवाद मानले.

एक तुळशीचे पान जसे देह आणि सर्व अन्न पवित्र आणि प्रसाद करते तसेच एक मूठ अन्न धान्य घरातून आणून नाथांच्या कोठीत दिल्यानंतर तो प्रसाद होऊन शेकडो वारकऱ्यांच्या मुखात पडतो म्हणून एक शीत दिधल्या अन्न… कोटी कुळांचे उद्धरण असे संतांनी म्हटले आहे. जेवण केल्यानंतर पोट भरते पण प्रसाद घेतल्यानंतर मन शुद्धी बुद्धी सातवी होते म्हणून तर नाथ संस्थानच्या मल्लप्पाची खीर अखंड भारतात प्रसिद्ध असल्याचे सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज म्हणाले………

किंबहुना तुमची केले धर्मकीर्तन सिद्धीस नेले ….अशी या अनुष्ठानाची महती आहे, ज्याच्या भाग्यात आहे, पुण्याई आहे नशिबात आहे तोवर त्याच्याकडूनच ही सेवा घडते यासाठी पुण्यसंचय करा नामसंकीर्तन गुरु सेवा साधना अनुष्ठान यामध्ये आपले जीवन प्रवाहित करा असे महाराज म्हणाले.

दहीहंडी गोपाळकाल्याने
श्रावण उत्सवाची सांगता
……………………………
शेवटी हजारो भक्त भावीक यांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडून गोपाळकाला वाटून यंदाच्या श्रावणमास अनुष्ठानची भक्ती जल्लोषात सांगता झाली यानंतर रात्रीचे महाप्रसाद पंगतीचा लाभ भाविकांनी घेतला.

सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात आणि सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासोबत मार्गदर्शन तथा नियोजना संपन्न झालेल्या या सांगता सोहळ्यास आदरणीय श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर आईसाहेब. ह भ प श्री गोरखनाथ महाराज, श्री मच्छिंद्रनाथ महाराज, श्री रवींद्रनाथ महाराज, श्री गोविंदरावजी माकणे मामा, ह भ प श्रीरंग गहिनीनाथ महाराज, सौ शर्मिलाबाई गुरुबाबा महाराज, सौ संचिताबाई मच्छिंद्रनाथ महाराज,सौ श्रद्धाबाई श्रीरंग महाराज, श्री अनिरुद्ध महाराज, चिरंजीव गीतेश्वर महाराज, अलगुडचे श्रीकांत पाटील व त्यांचे सहकारी, औसा लातूर निलंगा उदगीर तुळजापूर उस्मानाबाद सोलापूर यासह महाराष्ट्र आंध्र कर्नाटक तामिळनाडू आणि सर्व दूर आलेला शिष्यवर्ग यावेळी उपस्थित होता.

अत्यंत आनंद समाधान याची भक्तीची शिदोरी घेऊन आलेली हजारो सदभक्त वारकरी शिष्यवर्ग आपापल्या गावाकडे रवाना झाला.