24.9 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeठळक बातम्याचंद्रभागा स्वच्छतेसाठी हजारो हात एकवटले !

चंद्रभागा स्वच्छतेसाठी हजारो हात एकवटले !


रोटरीच्या जनजागृती अभियानाचे सर्वत्र कौतुक
तहानलेल्या वारकर्‍यांना ‘जल प्रसादम्’

लातूर, /पंढरपूर| प्रतिनिधी- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्यावतीने पंढरपूरात ‘रोटरी चंद्रभागा स्वच्छता व जन- जागरण अभियान’ राबविण्यात आले. चंद्रभागेचा परिसर स्वच्छ करण्यासाठी हजारो हात एकवटले होते. रोटरीच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या संकल्पनेतून व विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज यांच्या सहकार्याने रविवारी (दि. ५जून रोजी ) हे अभियान राबविण्यात आले. डॉ. मोतीपवळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब लातूर सेंट्रलचे माजी अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख ऍड. नंदकिशोर लोया, रोटरी क्लब लातूर मिडटाऊनचे माजी अध्यक्ष उमाकांत मद्रेवार, रोटरी क्लबचे सचिव लक्ष्मीकांत सोनी , मेघराज बरबडे यांच्या नेतृत्वाखालील हजारो रोटेरीयन रविवारी पंढरपूर दाखल झाले. लातूरसह पंढरपूर, सांगोला, अकलूज, टेंभूर्णी येथून देखील रोटेरीयन या अभियानात सहभागी झाले होते.


सकाळी ९ वाजता श्री तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदी किनारी ‘ महाद्वार घाट ते कुंभार घाट ‘ परिसर स्वच्छ करण्यासाठी शेकडो रोटेरीयन, स्वयंसेवक व नागरिक एकत्र आले. हभप गहिनीनाथ महाराज यांच्या आशीवर्चनानंतर या स्वच्छता अभियास प्रारंभ झाला. जवळपास दोन ते अडीच तास हे स्वच्छता अभियान चालले. यातून हजारो टन कचरा, प्लास्टिक गोळा करण्यात आला.


पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीचे प्रांत अधिकारी गजानन गुरव व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, लातूर कॅप्सचे अध्यक्ष शशिकांत चलवाड, रोटरीचे सहायक प्रांतपाल संतोष भोसले, संचालक दिलीप प्रभुणे, प्रकल्प प्रमुख उमाकांत मद्रेवार, ऍड. नंदकिशोर लोया, पंढरपूर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष विश्‍वास आराध्ये, महेश निर्मळे, लातूरचे डॉ. विनोद लड्डा, सुधीर लातुरे, सतीश कडेल, रूद्रा रिफ्रेजिरेटर्सच उमेश पत्रावळे, रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे अध्यक्ष किशोर निकते, सचिव प्रशांत कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्ष विजय म्हेत्रे, सचिव श्रीपती अडलिंगे, रोटरी क्लब ऑफ अकलूजचे अध्यक्ष नितीन कुदळे, सचिव गजानन जवंजळ, रोटरी क्लब ऑफ टेंभूर्णीचे अध्यक्ष नागेश कल्याणी सचिव सुजित बेलपत्रे आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे देशभरातून दररोज हजारो वारकरी दर्शनासाठी येतात या वाकर्‍यांसाठी थंड पाण्याची सोय व्हावी म्हणून श्रीकृष्ण मंदीर गोपाळपूर येथे ‘जल प्रसादम’ उभारणी करण्यात आली. हभप गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते हा प्रकल्प लोकार्पित करण्यात आला. देशभरातून येणार्‍या हजारो वारकर्‍यांची तृष्णा या थंडगार पाण्याने भागणार आहे. त्यामुळे त्यांचे अप्रत्यक्षपणे आशीर्वादच रोटरी क्लबला मिळणार आहेत. तसेच या स्वच्छता अभियानाची इतिहास नोंद होईल रोटरी क्लबने राबवलेल्या या अभियानाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अशा शब्दात महाराजांनी रोटरी क्लबच्या या अभियानाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]