लातूर
ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सदस्य मुकेश लाटे डी मार्ट मध्ये खरेदी करून नवीन रेणापूर नाका या मार्गाने घराकडे येत होते, त्यावेळेस त्यांना डी मार्ट जवळ कुणी अज्ञाताने कचरा व गवत पेटवून दिल्याचे दिसले.
पहाता पहाता ही आग दूरवर पसरत होती,शेजारील गवताचा दुसरा ढीग, झाडे ही होरपळत होती व त्या झाडांना सुद्धा आग लागली.
समय सुचकता दाखवत मुकेश लाटे यांनी मनपाच्या माननीय उपायुक्त विना पवार मॅडम यांना सूचना दिली,उपायुक्त मॅडम यांनी तात्काळ दखल घेत अग्निशमन दलाला कॉल केला व अग्निशमन गाडी पाठवून आग विझवली,
तोपर्यंत ४-५ झाडे आगीत भसमसात झाली होती, सर्वत्र धुराचे लोट उठले होते.
मुकेश लाटे यांनी जागरूक नागरिकांचे कर्तव्य बजावले असून त्यांच्या या कृतीचे डॉ. पवन लड्डा, इम्रान सय्यद, नागसेन कांबळे, दयाराम सुडे, महेश गेलडा, ऍड वैशाली यादव, पदमाकर बागल यांनी कौतूक केले आहे.
आम्ही सर्व टीम ने लातूर हरित करण्याचा दृढ निश्चय केला आहे त्यात सर्व लातूरकर यांनी सहभाग नोंदवला पाहिजे.
आपलं लातूर स्वच्छ लातूर, सुंदर लातूर, हरित लातूर करिता अहोरात्र झटणाऱ्या ग्रीन लातूर वृक्ष टीमचे कार्य सतत चालू राहील
नागरिकांनी कचरा पेटवून देऊ नये असे आवाहन सरस्वती विद्यालय या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुकेश लाटे यांनी हे कार्य केले आहे.