28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*ग्रीन लातूर वृक्ष टीमचा असाही हटके उपक्रम!* 

*ग्रीन लातूर वृक्ष टीमचा असाही हटके उपक्रम!* 

जिल्ह्यातील एकमेव गणपती, ना मंडप, ला लायटिंग, ना डेकोरेशन, ना देणगी, ना पट्टी

गणेशोत्सवाचे दहा दिवस

ग्रीन लातूर वृक्ष टीमचे समाजोपयोगी कार्य.

रस्ता रुंदीकरण मध्ये तोडले जाणारे पिंपळाचे झाड वाचवून

त्या झाडाला सजवून

नैसर्गिक वृक्ष रुपी गणपतीचा देखावा तयार केला

कुठलाही कापडी मंडप नाही, लायटिंग नाही, पूर्णपणे नैसर्गिक व काही टाकाऊ वस्तूंचा वापर करून हा वृक्षरूपी गणपती साकारण्यातआला.

हा वृक्ष रुपी गणपती पाहण्यासाठी व आरतीसाठी शिक्षक आमदार श्री विक्रमजी काळे, मनपा आयुक्त श्री अमनजी मित्तल, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दयानंदजी पाटील यांचे सह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने आले होते.

वृक्षरुपी गणपती पहायला आलेल्या भक्तांना फुलझाड, फळझाडे प्रसाद स्वरूपात देण्यात आली.

वृक्षरुपी गणपतीच्या भोवती पर्यावरण, स्वच्छता याचे संदेश देणारे फलक लावून जनजागृती करण्यात आली.

वृक्ष रुपी गणपती चा फोटो व सेल्फी काढून गणेश भक्तांनी याला जगभरात प्रसिद्धी दिली, सर्व वर्तमानपत्र यांनी वृक्ष रुपी गणपती उपक्रमास प्रसिद्धी दिली.

वेगळ्या प्रसिद्धीची गरज भासली नाही.

गणेशोत्सवाचा पहिला दिवस दोन कि.मी. दुभाजकाची स्वच्छता करून तीन ट्रॅक्टर केरकचरा काढला.

नागरिकांना स्वच्छतेचे महत्व सांगून जनजागृती केली.

गणेशोत्सवाच्या काळात सातशे झाडे लावली.

यावेळी ठिकठिकाणी नागरिकांसोबत संवाद साधून वृक्ष जोपासना करण्याचे आवाहन केले.

श्री गणेशाच्या प्रसाद स्वरूपात ४०० मोगरा फुलझाडे ठिक ठिकाणी वितरित केली.

दोन गणेश मंडळासोबत वृक्ष दिंडी काढून झाडांचे महत्व नागरिकांना पटवून दिले.

कित्येक गणेश मंडळांना झाडे, खड्डे, काठी साठी मदत केली.

पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करावे याकरिता गणेश मंडळाच्या स्टेज वरून नाट्य प्रयोग सादर करण्यात आले.

पर्यावरण पुरक गणेश विसर्जन कसे करावे याकरिता एक चित्रफित बनवून समाजमाध्यमातून सर्वत्र प्रसारित करण्यात आली.

प्लास्टिक केरकचरा रस्त्यावर, कचऱ्यात फेकू नये म्हणून इको ब्रिक्स चा उपक्रम गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर हाती घेण्यात आला.

ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या कार्याची दखल घेऊन शहरातील प्रतिष्ठित गणेश मंडळांनी श्री गणेश आरती साठी आमंत्रित केले होते, त्याठिकाणी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला.

गणपती आगमनापूर्वी लातूर जिल्हा परिसरात एक महिना पाऊस नव्हता, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती

यावेळी गणपती बाप्पाला पाऊस घेऊन ये पाचशे झाडे लावू असा नवस बोलण्यात आला.

गणपती बाप्पा भरपूर पाऊस घेऊन आले

आणि ग्रीन लातूर वृक्ष टीमने पाचशे पेक्षा अधिक झाडे लावून नवसपूर्ती केली.

कृषि महाविद्यालय लातूर यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते, त्याठिकाणी रक्तदान व वृक्षारोपण याबाबत उपस्थित विदयार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर कमी व्हावा याकरिता १४० पर्यावरण पूरक पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

आज शेवटच्या दिवशी स्वच्छता मोहीम राबवून २ टमटम केरकचरा एकत्रित केला.

शेवटी गणेश विसर्जन विधिवत पूजा करून श्री गणेशाला निरोप दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]