28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeराजकीय*ग्रा.पं.निवडणुकीत रमेशआप्पा कराड यांचे वर्चस्व*

*ग्रा.पं.निवडणुकीत रमेशआप्पा कराड यांचे वर्चस्व*

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात

        लातूर दि.२०-  लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील ७६ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात तब्बल ४२ ग्रामपंचायतीवर भाजपाचे सरपंच विजयी झाले आहेत. ग्रामपंचायतीच्‍या या निवडणूक निकालातून लातूर ग्रामीण मतदार संघात आ. कराड यांचे वर्चस्‍व सिध्‍द झाले आहे. 

       लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात लातूर तालुक्यातील ३१ रेणापूर तालुक्यातील ३३ आणि भादा सर्कल मधील १२ ग्रामपंचायतीसाठी निवडणुक झाली. या निवडणुकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि लातूर ग्रामीणचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ४२ ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. बहुसंख्य ग्रामपंचायत ही भाजपाच्या ताब्यात आल्याने आ. कराड यांचे लातूर ग्रामीण मतदार संघावर असलेले वर्चस्व सिद्ध झाले आहे. गेल्‍या विधानसभा निवडणुकीत कॉग्रेस वाल्‍यांनी रडीचा डाव खेळून लातूर ग्रामीण मतदार संघात विजय हस्‍तगत केला होता. या विजयाचा रोष मतदाराच्‍या मनात कायम असल्‍याने ग्रामपंचायत निवडणूकीच्‍या माध्‍यमातून मतदारांनी भाजपाच्‍या बाजून कौल देवून आपला रोष व्‍यक्‍त केला असल्‍याचे दिसून येत आहे. 

    रमेशअप्‍पा कराड यांनी मतदार संघात केलेल्‍या कामाची दखल घेवून भारतीय जनता पार्टीने त्‍यांना आमदार म्‍हणून विधानभवनात काम करण्‍याची संधी दिली. मिळालेल्‍या संधीच्‍या माध्‍यमातून गोरगरीब जनतेच्‍या डोळयातील अश्रू पुसण्‍याचे आणि शेतकरी शेतमजूर सर्वसामान्‍यांना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी कार्यरत राहीले. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावागावात वाडी तांड्यात आ. रमेशआप्पा कराड यांनी आपल्‍या आमदार निधीसह राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा विकास निधी मंजूर केला असंख्‍य विकासाची कामे केली. त्‍यामुळे ग्रामीण भागातील मतदारांनी भाजपाच्या पॅनलला विजयी करून आ. कराड यांनी केलेल्या कामाची पावती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]