शैक्षणिक व आर्थिक साक्षरता आणि सायबर गुन्हेगारी कडे ग्राहक पंचायत महाराष्ट्राने लक्ष देवून न्याय मिळवून द्यावा ; माहिती संचालक गणेश रामदासी
मुंबई / प्रतिनिधी कोरोनामुळे संपूर्ण जग गेल्या दीड वर्षांपासून लाॕकडाऊनमुळे व कोरोनाच्या अदृश्य विष्णाणू या महामारीमध्ये बंद असल्या तरी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य या संघटनेचे ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक हिताचा कायदा केंद्र सरकार व सर्व राज्यांच्या राज्य सरकारांना लागू करण्यास भाग पाडले. याच ग्राहक तीर्थ बिंदु माधव जोशींची ग्राहक चळवळीचा प्रचार, प्रसार, जनजागृती, जाणीव जागृती, ग्राहकांचे हक्क, कर्तव्य व जबाबदारी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संघटनेने खांद्यावर घेत कोविड-१९ च्या काळातही ऑनलाईन व ऑफलाईन च्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय लाड व राज्य कार्यकारिणी, पदाधिकारी, विभाग अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, संघटक, तालुकाध्यक्ष, गाव शाखाध्यक्ष, संघटक, उपाध्यक्ष, संघटक, सदस्य व पदाधिकारी यांनी ग्राहकांच्या हितासाठी सुरू ठेवली आहे.
ग्राहकांना कोरोना काळात सामाजिक, अध्यात्मिक व व्यवहारिक ज्ञान, ग्राहक जागर, अशा चातुर्मासाच्या चार महिन्यात यातील कालावधीत सुरू होणाऱ्या ग्राहक हक्काची जाणीव जागृती व जनजागृती चा (दि.२१) जुलै वार बुधवार रोजी सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी आॕनलाईन वेबिनार चे उध्दघाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबईचे संचालक गणेश रामदासी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. उध्दघाटन पर मार्गदर्शन करताना गणेश रामदासी यांनी सामाजिक, आध्यात्मिक व व्यावहारीक ज्ञान, ग्राहक जागर अशा चातुर्मासाच्या प्रारंभ काल पासून झाला. असून गणेश रामदासी यांनी सायबर क्राईम मधील कुठलेही गुन्हे दाखल करायचे असेल तर या १५५२६० क्रमांकावर कळवावे. याबद्दल खूप चांगली माहिती दिली. दोन दोन एकर च्या छोट्या शेतीला गटशेती अंतर्गत सामूहिकपणे केल्यास जास्त लाभ घेता येईल ही संकल्पना मांडली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य या उपक्रमाचे कौतुक केले व ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांचा ग्राहक जनजागृती चळवळीत चा वारसा पुढे चालू ठेवल्याबद्दल ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे राज्य प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय लाड, राज्य सचिव अरुण वाघमारे, संघटक सर्जेराव जाधव, सहसंघटक मेधा कुलकर्णी, राज्य कार्यकारिणी सदस्य व मार्गदर्शक प्रमोद कुलकर्णी, मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोकण, विदर्भ, नागपुर, अमरावती व कोकण विभागातील विभाग अध्यक्ष, विभाग संघटक, जिल्हाध्यक्ष, जिल्हा संघटक, तालुकाध्यक्ष, तालुका संघटक व सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी, सर्व सदस्य ऑनलाइनचे प्रोजेक्ट संयोजक, प्रायोजक महेश चावला व जळगाव टीमचे कौतुक करीत पुढील ग्राहक चळवळीच्या संघटन व बांधण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सध्या चालू असलेल्या शिक्षण , शैक्षणिक व आर्थिक साक्षरता आणि सायबर गुन्हेगारी, क्राईम याकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्राने लक्ष देऊन ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य संघटक सौ मेधाताई कुलकर्णी यांनी केले.ग्राहक गीत शुभांगी पिंपळगावकर यांनी गायले. अध्यक्षीय समारोप राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वसुंधा जहागीरदार तर आभार राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी मांनले. ऑनलाइन तंत्र साहाय्य महेश चावला आणि टीम जळगांव यांनी केले. कृपा कुलकर्णी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या ऑनलाईन कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्राहक चळवळीतील जिल्ह्यातील विभाग अध्यक्ष, विभाग संघटक, जिल्हाध्यक्ष, जिल्हा संघटक, तालुकाध्यक्ष, तालुका संघटक मोठ्या प्रमाणावर आॕनलाईन वेबिनारात उपस्थित होते.तसेच (दि.२२) जुलै वार गुरूवारी रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्यातील सहा विभागाच्या विभाग अध्यक्ष, उपाध्यक्ष, संघटक व सचिव यांची चातुर्मास कार्यक्रम घेण्यासंदर्भात प्रत्येक विभागास कार्यक्रम पत्रिका तयार करण्यासंदर्भात व विविध विभागातील शासकीय अधिकारी, एक प्रव्क्ता, राज्य सदस्य यांचा समावेश कार्यक्रम घेण्यात यावे, असे आॕनलाईन वेबिनारात मार्गदर्शन करण्यात आले.आॕनलाईन वेबिनार कार्यक्रमास राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड, संघटक सर्जेराव जाधव, सचिव अरूण वाघमारे, सहसंघटक सौ.मेधाताई कुलकर्णी, राज्य कार्यकारिणी सदस्य व मार्गदर्शक प्रमोदराव कुलकर्णी व सर्व सहा विभागाचे विभागीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, संघटक व सचिव उपस्थितीत होते.