ग्रामीण भागात बैल पोळा उत्साहात

0
389

निलंगा शहरासह ग्रामीण भागात बैलपोळा उत्साहात साजरा…!

निलंगा,—( प्रशांत साळुंके )— निलंगा शहरासह ग्रामीण भागात बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी, घरातील कौटुंबिक प्रमुखासह आपल्या घरासमोर बैलपोळा यासणासाठी लग्न लावण्याचे औचित्य असते.त्यामुळे सर्वच नगरातील व ग्रामीण भागातील गल्लीबोळ्ळातील नागरिक व महिला,बालगोपाळांची मोठ्यासंख्येने एकञ उपस्थिती पाहावयास मिळाली.

बैलपोळा सणाच्या आदल्यादिवशी शेतकरी आपल्या बैलासह सर्वच जनावरे शेतात घेऊन जातात.त्याठिकाणी बैलांना व इतर जनावरांना सज्जवण्यात शेतकरी व सालगडी व्यस्त असतात.यात,त्यांच्या बैलाच्या इतर जनावराच्या शिंगास कलर लावणे त्यांची सजावट करणे,शाँपूने आंघोळ घालणे इतर कामे उरकून दुसर्‍यादिवशी सर्वच जनावरे दुपारच्या वेळी शहर व गावातील मारूती मंदिराच्या चौबाजूंनी प्रदक्षिणा घालून फिरवतात हे विशेषत्वाने पाहावयास मिळत आहे सर्प्रथम मान-सन्मान आजही शहर व ग्रामीण भागात पाटील याकुटुंबाकडे आहे तीच सांस्कृृती परंपरा जपली जात असल्याने त्यास विशेषत्त्वाने मानले जाते.

म्हणून शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा मानबिंदू बैलपोळा सणादिवशी असतो हे विशेष आहे.त्यामुळे शहर व ग्रामीण भागात या बैलपोळा सणाला खूप महत्त्व आहे.बैलपोळा लग्न लावण्यासाठी शहर नगरात व ग्रामीण भागात सर्व कुटुंबाला बोलावून लग्न लावण्यासाठी प्रथा आहे.त्याचसोबत जेवणावळीसाठी विशेष आमंञण सांगून हा कार्यक्रम उरकला जात असतो त्यामुळे यंदाही कोरोनाचे सावट असल्याने त्यानियमावलीनुसारच हा सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे.याप्रसंगी शेतकरी कुटुंबातील सदस्य,सालगडी,इतर मिञपरिवाराची उपस्थिती बैलपोळा सणानिमित्त पाहावयास मिळाली.

एकंदर,बैलपोळा सण हा आपल्या कुटुंबातील प्रमुख व महीला,बालगोपाळासह मोठ्या संख्येने आपल्या सांस्कृृतिनुसार हा सण शेतकर्‍यांनी उत्साहात साजरा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here