आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते तिनशे लाभार्थी शेतकऱ्यांना गोठा मंजुरीचे पत्र….
औसा,-( प्रतिनिधी) –
मतदारसंघातील सर्व शेतकर्यांना गोठा, शेततळे, सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प असे लाभ देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी ‘मनरेगातून ग्रामसमृद्धी’ हे अभियान राबविले आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून दि. २१ फेब्रुवारी रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी एकाच दिवशी औसा तालुक्यातील ३०० लाभार्थी शेतकऱ्यांना गोठा मंजुरीचे पत्र प्रातिनिधिक स्वरूपात वितिरित केले.
औसा विधानसभा मतदारसंघातील हजारो गोठे बांधण्याचं उद्दिष्ट आ. अभिमन्यू पवार यांनी ठेवले असून त्यात कुशल-अकुशल चे प्रमाण ही अडचण ठरत असून त्यात सुधारणा व्हावी यासाठी शासनस्तरावर ते सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहेत . कुशल-अकुशल चे प्रमाण सुधारले की गोठ्यांची संख्या शेकडोवरून हजारोत जाणार आहे. औसा तालुक्यातील नागरिकांचे रखडलेले प्रश्न,कामे मार्गी लावण्यासाठी तहसील कार्यालय औसा येथे सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी या गोठा मंजूरीचे पत्र वितरित करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी,औसा नगरपरिषद मुख्य अधिकारी वसुधा फड, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे,नायब तहसीलदार कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर. आर.शेख, महावितरणचे अभियंता जाधव, यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.