निलंगा येथील महाराष्ट्र सार्वजनिक वाचनालयाचे सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे यांच्या हस्ते नवीन इमारतीचे लोकार्पण व स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्रघाटन
निलंगा,-(प्रतिनिधी)-निलंगा येथील महाराष्ट्र सार्वजनिक वाचनालयाच्या राजा राममोहन राॅय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता यांच्या समान निधी योजनेअंतर्गत अर्थसहायातून बांधकाम झालेल्या नवीन इमारतीचे लोकार्पण व स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्रघाटन सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे यांच्या हस्ते करण्यात आले.
औरंगाबाद येथील सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे यांनी इमारतीच्या लोकार्पण व स्पर्धा परीक्षा केंद्राच्या उद्रघाटन प्रसंगी बोलताना म्हणाले,महाराष्ट्र सार्वजनिक वाचनालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी या वाचनालयाच्या अध्यक्ष व सचिवांच्या तसेच सदस्यांमुळे ही मोठी इमारत उभा करण्यात सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले.तसेच,महाराष्ट्र सार्वजनिक वाचनालयाला अ वर्ग प्राप्त करून देण्यासाठी शासनस्तरावरील जी.आर.परवानगीचा निघाल्यानंतर निश्चितच अ वर्गास मान्यता देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

याप्रसंगी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हावगीराव बेरकीळे,ग्रंथालय निरीक्षक सोपानराव मुंडे, संघाचे कोषाध्यक्ष प्रभाकर कापसे,तांत्रिक सहाय्यक हरिश्चंद्र डेंगळे हे होते.या कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष युवराज जाधव, सूर्यकांत शिरसे,सहकार्यवाह काशिनाथ बोडके,एल.बी.आवाळे, कार्यउपाध्यक्ष अनिल पाटील, संचालक ग्रंथमित्र संजय सुर्यवंशी,ग्रंथपाल सूर्यकांत जाधव,गिरीधर जंगाले, संतोष करमले, चळवळीतील ग्रंथालय कार्यकर्ते लक्ष्मण भालके,विजयकुमार होगले,चंद्रशेखर ढगे, वसंत मोरे,चौधरी, बोयणे,साहेबराव गायकवाड, कृष्णा पिंजरे,शेटकार इ.महाराष्ट्र सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक व ग्रंथपाल गुप्तलिंग स्वामी,यशोदीप व इंदिरा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष एस.आर.काळे,सचिव सौ.एस.एस.काळे,ग्रंथपाल प्रशांत साळुंके,ग्रंथपाल शिवराज स्वामी व असंख्य ग्रंथालय कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मनोहरराव सांगवे यांनी केले तर आभार उत्तमराव करसुळे सर यांनी मानले.सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.