दयानंद कला महाविद्यालयात ग्रंथालय दिन साजरा.
डॉ संदीप जगदाळे यांनी ग्रंथालयाला दिली 11000 रुपयांची पुस्तके
ला.दि.12 १२ ऑगस्ट हा दिवस भारतात ग्रंथपालनशास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिन. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस ग्रंथालय दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रंथालय दिनाचे औचित्य साधून दयानंद कला महाविद्यालयात प्राचार्य डॉ एस पी गायकवाड यांच्या हस्ते डॉ एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रंथपाल प्रमुख प्रा विना कुलकर्णी यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.त्या म्हणाल्या की,”डॉ रंगनाथ यांचा तंजावर जिल्ह्यातील शियाळी गावात जन्म झाला. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये झालं. त्यांना इंग्रजी वाङ्मयात प्रथम श्रेणीत पदवी मिळाली. डॉ. रंगनाथन यांना स्वतःला ज्ञानार्जनासाठी ग्रंथालयाचे महत्त्व पटले होते आणि विद्यार्थ्यांनाही त्यांनी ग्रंथालयाची गोडी लावली. म्हणूनच पुढे जानेवारी १९२४ मध्ये त्यांची मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल म्हणून नेमणूक झाली. त्यांनी ग्रंथालयातील ग्रंथसंग्रहाचे उत्तम पद्धतीने जतन करण्याची शास्त्रीय पद्धत तर घालून दिली त्याचबरोबर त्यांनी अधिकाधिक वाचक ग्रंथालयाकडे आकर्षित करण्यासाठी अथक प्रयत्न केले.
याच कार्यक्रमात राज्य मंडळ सदस्य डॉ संदिपान जगदाळे यांनी संगीत विभागातील विद्यार्थी,लोकसहभाग व स्वखर्चातून जमा केलेली 11000 रुपयांची 142 पुस्तके महाविद्यालयातील ग्रंथालयास भेट म्हणून दिली.यात कथा,कादंबरी, काव्य संग्रह,प्रवास वर्णन,आत्मचरित्र आदी पुस्तकांचा समावेश आहे.
या कार्यक्रमात ग्रंथालयातील सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार प्राचार्य डॉ एस पी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक दिलीप नागरगोजे,डॉ सुनिता सांगोले, कार्यालयीन अधीक्षक श्री नवनाथ भालेराव यांनी केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथालयीन कर्मचारी श्रीकांत जोशी, विक्रमसिंह ठाकुर,उमेश येलमटे,श्री गिरबणे ,गणेश पुजारी यांनी परिश्रम घेतले.