गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत
“आयडिया फॉर विकसित महाराष्ट्र युवा संवाद”
लातूर/प्रतिनिधी:लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ.सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आयोजित "आयडिया फॉर विकसित महाराष्ट्र युवा संवाद" कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. युवक- युवतींनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,मराठवाडा भाजपा संघटनमंत्री संजय कौडगे,भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षा अनुप मोरे माजी आमदार शिवाजीराव पाटील कोळेकर आयडिया फॉर विकसित महाराष्ट्र मराठवाडा एडवोकेट युवराज पाटील भाजपा माजी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मागे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश गोमसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या देशात व महाराष्ट्रात तरुणांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आणि क्षमता असल्याचे सांगितले.राज्यातील तरुणांसाठी महायुती सरकार विविध योजना राबवत आहे.या योजनांचा लाभ तरुणांना मिळत आहे.त्यातून राज्याच्या विकासासाठी आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी तरुणांची भुमिका महत्वाची असल्याचेही सावंत म्हणाले.
अभियानाच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमास उपस्थित तरुणांनी आपल्या संकल्पना उपस्थित मान्यवरांसमोर मांडल्या.या संकल्पनांची नोंद घेत त्याबाबत त्याबाबत भविष्यात योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
या संवादात्मक कार्यक्रमात मांडलेल्या तरुणांच्या प्रश्नांना मान्यवरांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
यावेळी प्रमोद वारकुडकर, अविनाश पोळे,राष्ट्रीय युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य विवेकानंद उजळंबकर,लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे,दत्ता चेवले,जंगम समाज अध्यक्ष श्रावण जंगम,संतोष तिवारी, राजेश पवार,योगेश गंगणे,अजय कोटलवार,प्रसाद नाईकवाडे, पंकज देशपांडे,मंदार कुलकर्णी यांच्यासह युवक- युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.