शेतकऱ्यांसाठी समर्पित भाव ठेवून त्यांना जागृत करण्याकरिता आयुषभर संघर्ष करणाऱ्या नेत्याचा सन्मान-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,
श्री.गोविदभाई मेमोरियल अवॉर्ड पाशा पटेल यांना प्रदान,
आंतरराष्ट्रीय उद्योगपतींची उपस्थिती
औसा ; ( वृत्तसेवा )-
शेतकऱ्यांना न्याय देण्यासह त्यांना सतत जागृत ठेवण्यासाठी समर्पित भाव ठेवणाऱ्या पाशा पटेलांनी जीवनात भरपूर संघर्ष केला.ते आजही तत्परतेने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीकरिता विशेष कार्यासह उत्कृष्टरित्या बांबूची शेतीही करत आहेत.अशा
कर्तृत्वान नेत्याचा द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया, जीजीएन रिसर्च राजकोट/इंदूरच्या सहकार्याने”श्री गोविंदभाई मेमोरियल अवॉर्ड् प्रदान करुन सन्मान होते, हे अभिनंदनास्पद बाब असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बोलताना सांगितले.
मुंबईत येथील येथे आंतरराष्ट्रीय तेलबिया उद्योगांशी निगडीत उद्योगपतीच्या उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तेलबियावरील प्रक्रिया,शेतकऱ्यांचे वाढते उत्पादन आणि भविष्यात करावयाचे बदलाविषयी सखोल मार्गदर्शन झाली. या सोहळ्याकरिता इंडोनेशियाचे व्यापार मंत्री डॉ. जेरी संबुगा,सीयुकेके चे चेअरमन किलिंग कुमाग,रिफाईन्ड आरबीओ आईल मिल्स थायलंडचे बी.के.गोएंका, एन बी गोदरेज (व्यवस्थापकीय संचालक, गोदरेज ग्रुप) केंद्रीय कृषी सचिव मनोज अहुजा , अशोक दलवाई (माजी अध्यक्ष कृषी मूल्य आयोग)अतुल चतुर्वेदी (विशेष सल्लागार अदानी ग्रुप) संजीव अस्थाना (मुख्य कार्यकारी अधिकारी पतंजली ग्रुप)आशीष आचार्य, अंशू मलिक (व्यवस्थापकीय संचालक (अदानी विल्मार ग्रुप) दोराब मिस्त्री (संचालक, गोदरेज इंटरनॅशनल) यांची उपस्थिती होती.
देशात जागतिक दर्जाचे संशोधन व्हावे असे बोलताना गडकरी म्हणाले,इतर देशाच्या तुलनेत भारतात प्रति एकरी सोयाबीन उत्पन्न फारच कमी असल्याने उद्योगधंदे अडचणी आले.जोपर्यंत तेलबियाचे उत्पादन वाढणार नाही. तोपर्यंत उद्योगधंदे फायद्यात येणार नाही. याकरिता उच्चतम सोयाबीनचे बियाणे तयार करणे आवश्यक आहे.ज्यामुळे उत्पादन वाढेल.सध्या देशात राईसचे उत्पादन चांगले असल्याने तेलांचे प्रमाण अधिक आहे.मत्स,पोल्ट्री आणि दुग्ध व्यवसाय तेजीत वाढत असून त्यासाठी सोयाबीनची मदत मिळू शकते असे शेवटी बोलताना सांगितले.