लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांना
आ. रमेशअप्पा कराड यांच्याकडून अभिवादन
लातूर दि.१२ – देशाचे माजी ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्राचे लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती दि.१२ डिसेंबर २०२२ सोमवार रोजी रेणापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात स्व. मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड आणि बांबू लागवड सल्लागार समितीचे राष्ट्रीय सदस्य पाशा पटेल यांनी विनम्र अभिवादन केले.
तत्कालीन रेणापूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी, महाराष्ट्राचे लोकनेते, देशाचे माजी ग्रामविकास मंत्री स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीचा कार्यक्रम रेणापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. यावेळी आ. रमेशअप्पा कराड यांच्या समवेत रेणापूर शहरासह तालुक्यातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व मुंडे साहेब यांच्यावर प्रेम करणार्या सर्व स्तरातील नागरिकांनी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, वसंत करमुडे, ओबीसी मोर्चाचे मराठवाडा संपर्क प्रमुख बाबासाहेब घुले, रेणापूरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, पसचे माजी उपसभापती अनंत चव्हाण, रेणापूरचे शहराध्यक्ष दत्ता सरवदे, माजी तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण जाधव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत कातळे, जिल्हा सोशल मिडीया संयोजक महेश गाडे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा अनुसया फड, तालुका उपाध्यक्ष राजकुमार आलापुरे, श्रीकृष्ण पवार, युवा मोर्चा शहराध्यक्ष गणेश चव्हाण, नगर पंचायतीचे माजी नगरसेवक विजय चव्हाण, उज्वल कांबळे, अंतराम चव्हाण, श्रीकृष्ण मोटेगावकर, लखन आवळे, भागवत गित्ते, मुन्ना गुर्ले, हणमंत भालेराव, रमेश वरवटे, उत्तम चव्हाण, शास्त्री चव्हाण, दिलीप चव्हाण, रमेश चव्हाण, संतोष राठोड, अजित गायकवाड, अच्युत कातळे, गणेश माळेगावकर, उत्तम घोडके, अजय मरलापल्ले, नंदकुमार बंडे, प्रशांत बंडे, नवनाथ बंडे, सचिन लोकरे, संतोष साळुंके, प्रदीप चव्हाण, पप्पू कुडके, सोमनाथ सातपुते, सोपान सातपुते, ज्ञानोबा सातपुते, गोपाळ राऊत, राजकुमार ठोंबरे, शहेनशाह भाई, खुद्दस भाई, संजय विरुळे, मकसूद शेख, प्रशांत नागमोडे, राजूभाऊ अकनगिरे, सचिन सिरसकर, शरद जाधव, योगेश राठोड, मारुफ आत्तार, रफिक शिकलकर, विकी राजे, परमेश्वर मोटेगावकर, जयदीप बोडके, हुसेन पठाण, सुरज फुलारी, छबू गौतम, कारभारी चव्हाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व सर्व स्तरातील नागरीक उपस्थित होते.