लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने देशात दुसरी स्वातंत्र्याची लढाई
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथला
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या
प्रमुख उपस्थितीत काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न
लातूर (प्रतिनिधी ): दि. ३ मे २०२४ लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने देशात दुसरी स्वातंत्र्याची लढाई आता होत आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा सत्यानाश केला आहे, त्यांनी दिलेले एकही आश्वासन पाळले नाही. यामुळे देशातील जनता नाराज आहे यामुळे इंडीया आघाडीचा विजय निश्चीत आहे असे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे रमेश चेन्नीथला महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. ३ मे रोजी दुपारी लातूर शहरातील मार्केट यार्ड येथे लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली यावेळी ते बालेत होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, काँग्रेसचे लातूर लोकसभा निरीक्षक अमर जाधव, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुनीता चाळक, सर्जेराव मोरे, उदय गवारे, माजी सभापती ललीतभाई शहा, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडिले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे,अशोक गोविंदपूरकर विद्याताई पाटील सुभाष घोडके, अशोक (गट्टू) अग्रवाल, चंद्रकांत पाटील, तुळशीराम गंभीरे, बालाजी जाधव, अरुणा मोरे, आदींसह काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी,कार्यकर्ते आडते खरेदीदार गुमास्ता हमाल मापाडी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकनेते विलासराव देशमुख माझे मित्र होते ते आम्हाला त्यांनी मदत केली
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, देशात दुसरी स्वातंत्र्याची लढाई आता होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा सत्यानाश केला त्यांनी दिलेले एकही आश्वासन पाळले नाही. लोकनेते विलासराव देशमुख माझे मित्र होते ते केरळला आले होते, आम्हाला त्यांनी मदत केली. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वातून लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे विजय होतील असे सांगून येत्या ७ मेला लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेसने कर्नाटक तेलंगणात गॅरंटी कार्डची अंमलबजावणी केली
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात आता इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. विदर्भातील व मराठवाड्यातील सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार असून मोदींनी दहा वर्षात सामान्य माणसासाठी काही काम केले नाही. काँग्रेसचा जाहीरनामा मोदी मोडूनतोडून सांगतात काँग्रेसने कर्नाटक तेलंगणात गॅरंटी कार्डची अंमलबजावणी केली आहे, असे सांगून येत्या ७ मेला लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्रात सोयाबीनची राजधानी म्हणून लातूरची ओळख या उद्योगाला आपणाला वाढवायचे आहे
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, भाजप खासदार कधीही मार्केट यार्ड येथे आले नाहीत, मार्केट यार्डचे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत, देशात व राज्यात आता बदल घडणार आहे. महाराष्ट्रात सोयाबीनची राजधानी म्हणून लातूरची ओळख आहे. या उद्योगाला आपणाला वाढवायचे आहे, महायुती सरकारने आरक्षणाचे राजकारण केले त्यांना धडा शिकवा. देशात व राज्यात भ्रष्टाचार फोफावला आहे, भाजपने पक्ष फोडले घर फोडले आमदार फोडले राज्यात महाविकास आघाडीची हवा आहे, त्या हवेचा अधिक जोर मराठवाड्यात आहे असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, लातूर लोकसभेच्या भाजप उमेदवाराला अनेक गावात बंदी घातली गेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत, देशात लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत. भाजपने दोन लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले आहे. देशात आता बदल घडतोय त्या बदलात जनतेने सामील व्हावे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची परंपरा लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे पुढे सुरू ठेवतील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही डॉक्टर काळगे यांचा संदेश सर्वदूर पाठवावा असे सांगून येत्या ७ मेला लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे माजी नगरसेवक अशोक गोविंदपुरगर यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावने यांनी केले तर सूत्रसंचलन संचालक सचिन सूर्यवंशी यांनी केले तर शेवटी आभार संचालक युवराज जाधव यांनी मानले.
——