नांदेड: सप्टेंबर, २०२३: नुकतेच पंजाब राज्यातील काही कापूस उत्पादन क्षेत्रांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. पेरणीनंतर ६० ते ८० दिवसांच्या कापूस पिकाच्या बाबतीत कापूस उत्पादक शेतकर्यांवनी गुलाबी बोंडअळीविरूद्ध प्रतिकार व्यवस्थापनाच्या उद्देशाने सर्व उपलब्ध व्यवस्थापन गोष्टी एकत्रित करणे महत्वाचे ठरते. “गुलाबी बोंडअळी बोंडात शिरते आणि बाहेरून दिसणे अवघड असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहून फुलांची आणि कापूस बोंडांची तपासणी करणे, गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे त्वरीत ओळखणे आणि तात्काळ कारवाई करणे उचित आहे, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी सुरुवातीच्या काळात येणाऱ्या फुलांचे निरीक्षण करणे महत्वाचे आहे, जर कापूस पिकाची फुले गुलाबाच्या फुलासारखी झालेली दिसल्यास शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी तात्काळ कारवाई करावी. ” असे गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडच्या क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजावेलू एन.के. म्हणाले.
त्यांच्या मते या धोक्याचा सामना करण्यासाठी कमी कालावधीच्या कापसाच्या वाणांचा अवलंब करणे, कीड तयार होण्यापासून परावृत्त करण्यासाठी बदली पीक घेण्याचा सराव करणे, पिकांच्या फोलफटांची विल्हेवाट लावणे आणि नायट्रोजन युक्त खतांचा अनुकूल वापर करणे आवश्यक आहे.अभ्यासातून असे दिसून आले आहे की गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कापूस पिकाच्या मधल्या व नंतरच्या अवस्थेत होतो. म्हणून गुलाबी बोंडअळीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी वेगळे कृती गट असलेली कीटकनाशके रोटेशन किंवा मिश्रणात वापरली गेली पाहिजेत.
उदाहरणार्थ, एल्पिडा २०० ग्रॅम प्रति हेक्टर यांसारखी कीटकनाशके – पहिल्या फवारणीदरम्यान स्क्वेअर किंवा बॉल सेटिंग स्टेजवर, तर बोंडाची निर्मिती आणि परिपक्वता अवस्था यामध्ये ८०० मिली प्रति हेक्टर झार आणि सॅटीसफाय १००० मिली प्रति हेक्टर दुसऱ्या फवारणी दरम्यान वापरल्यास शेतकऱ्यांना कीड प्रतिकारात पुढे राहण्यास आणि त्याच्या वाढीला रोखण्यास मदत मिळू शकते.“अंडी असताना किंवा पूर्ण विकास झाल्यावर कीटकनाशके वापरण्याची शिफारस केली जाते. तथापि, वेळीच सावध राहणे आणि सुरुवातीपासून प्रतिरोधक अशा कापसाच्या वाणांची पेरणी केल्यास कापूस बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळता येईल,” असे श्री. राजावेलू पुढे म्हणाले.