लातूर -गुबाळ ता. औसा येथे श्री संत शिरोमणी मारुती महाराज कानेगावकर यांच्या स्मरणार्थ कार्तिकी एकादशी निमित्त ह.भ.प. विठ्ठल महाराज कोथळे सारणीकर व त्यांच्या भक्तगण आयोजित पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान ह. भ. प. महेश महाराज माकणीकर व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या उपस्थितीत प्रस्थानाचा व नवीन रथाचा शुभारंभ झाला
गेली 21 वर्षे सतत ही दिंडी गुबाळ लिंबाळा सारणी नादुर्गा हसलगन ते पंढरपूर सोहळा संपन्न होत आला आहे ह्या दिंडी चे हे 22 वे वर्ष आहे या पंचक्रोशील बहुसंख्य भक्त या दिंडी मध्ये सामील होतात या दिंडीस या भागात एक वेगळे महत्त्व आहे
या प्रसंगी हभप महेश महाराज माकणीकर, महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी, हभप विठ्ठल महाराज सारणीकर यांनी मार्गदर्शन केले
यावेळी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, अभिजीत जाधव, लिंबाळा सरपंच विलास नांरगवाडे, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, गणेश जाधव, डॉ. अनिल पाटील, उपतालुकाप्रमुख किशोर भोसले,रतन तमशेट्टी, संग्राम जाधव, मनोज शिंदे, सुधीर सलगर, शरद नांरगवाडे, भागवत करणुरे, नितीन जाधव, गोपाळ होळकर ह. भ. प. वसंत बोंडगे महाराज आदीसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ या भक्तिमय सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते.