19.2 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeशैक्षणिक*गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

*गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

निलंगा ; दि.१८ ( प्रतिनिधी) महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे NIPER-JEE मधील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ बी एन पौळ सर होते व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एस एस पाटील सर होते.

यावेळी महाविद्यालयातर्फे महाराष्ट्र शिक्षण समिती चे संस्थापक अध्यक्ष कै डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब (माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ NIPER-JEE ASPIRANT Award मध्ये ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा श्री विजय पाटील निलंगेकर साहेबांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

महाविद्यालयातील NIPER-JEE मधील गुणवंत विद्यार्थी

1) शिंदे अक्षय मधुकर (AIR- 92)

2) वडते नितीन सहदेव (AIR- 117)

3) वासुरे प्रवीण पांडुरंग (AIR-227)

4) आगलावे गायत्री सुनिल (AIR-295)

5) गिरी अंजली हरिराम (AIR- 670)

6) काटे लक्ष्मण बाबु(AIR- 1733)

7) निकम तुकाराम पांडुरंग (AIR-1973)

8) मुंडकर तिरुपती किशनराव(AIR- 2241)

यावेळी प्रमुख अतिथी डॉ बी एन पौळ सरांनी बदलत्या परिस्थिती नुसार विद्यार्थ्यांनी सखोल असा अभ्यास करुन ज्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना आवड आहे त्या क्षेत्रात त्यांनी विशेष मेहनत घेऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यामध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवुन स्पर्धेच्या युगात आपला MCP चा विद्यार्थी कसा तयार झाला पाहिजे या बद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एस एस पाटील सरांनी GPAT, NIPER इत्यादी परीक्षेसाठी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना विशेष तयारी करुन घेण्यासाठी व भविष्यात आणखी चांगले मार्गदर्शन विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचवता येईल याबद्दल सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा इर्शाद शेख यांनी केले , यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

यानंतर अंतिम वर्षातील विध्यार्थ्यांना विद्यार्थी व महाविद्यालयातर्फे निरोप समारंभ कार्यक्रम करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]