*आयआयबी च्या नीट 2021 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.*
आयआयबी बनले निटसाठी केंद्रबिंदू
लातूर ( प्रतिनिधी)-12 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा ‘नीट’ घेण्यात आली होती. यापरिक्षेचा निकाल 1 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून आयआयबी च्या 33 विद्यार्थ्यांनी बायोलॉजी मध्ये पैकी च्या पैकी गुण मिळवले आहेत. तर एकूण 720 गुणांपैकी 710 गुण मिळवत अनिरुद्ध ढाखरे या विद्यार्थ्यांने देशात 38 वा क्रमांक मिळवला आहे.
अनिरुद्ध ने कार्यक्रमात आपले मनोगत मांडताना आयआयबी ची 2 वर्ष मिळालेल्या स्कॉलरशिपचा आवर्जून उल्लेख केला. शिक्षकांवरचा विश्वास आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचवतो असेही टीम आयआयबी वरील त्याचा विश्वासामुळेच मी हे यश मिळवू शकलो असे सांगत उपस्थित विद्यार्थ्यांना त्याने शिक्षकांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
आयुष ढवळे – 360/360
“तलाश जारी रखो सफर हसीन होगा हकीकत बन जायेगा हर सपना अगर खुद पे यकीन होगा” असे म्हणत आयुष ने उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या आणि नीट च्या तयारीसाठी आयआयबी बेस्ट असल्याचे सांगितले. या विद्यार्थ्यांला देखील आयआयबी ची 11 वी आणि 12 वी दोन्ही वर्ष स्कॉलरशिप मिळालेली होती.
अनिल राठोड (यशश्रीचे वडील) 360/360)
पालकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून आपल्या पाल्याचा आधार बनावे. यशश्री चे पालक – अनिल राठोड यांनी टीम आयआयबी चे तोंडभरून कौतुक करत आयआयबी च्या आत्तापर्यंत च्या यशाचे जणू रहस्य म्हणजे पालक आणि विद्यार्थ्यांचा आयआयबी वरील विश्वास असल्याचे सांगत नीट च्या तयारी साठी आयआयबी सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगितले. तज्ञ प्राध्यापक, वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन वैयक्तिक लक्ष विद्यार्थी आणि पालकांसोबत नियमित संवाद याचा या यशामध्ये मोठा वाटा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्योती वट्टमवार (अथर्वची आई)
आपले मनोगत मांडताना त्यांनी उपस्थित पालकांना विद्यार्थ्यांवर विश्वास ठेऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचा सल्ला दिला.
तसेच टीम आयआयबी ने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करून टीम आयआयबी ला शुभेच्छा दिल्या.
आयआयबी च्या 22 वर्षांचा इतिहास सांगत संचालक डॉ. महेश पाटील यांनी आयआयबी 100% ओरिजिनल निकाल देत असल्याचा दावा करत विद्यार्थ्यांना निरीक्षक बनून क्लासेसची गुणवत्ता तपासण्यासाचे आवाहन केले.आयआयबीमुळे नीट च्या तयारीसाठी महाराष्ट्राबाहेर जाणारा विद्यार्थ्यांचा लोंढा थांबत असून त्यांना आयआयबी त्यांना नांदेड आणि लातूर येथे नीट च्या तयारीसाठीभक्कम व सर्वोत्तम पर्याय देत असल्याचे सांगितले. तुलनेने माफक शुल्क आकारून राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता सिद्ध करत वेगळा आदर्श निर्माण केल्याचे व्यव्थापकिय संचालक दशरथ पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व आयआयबी टीमचे सहकार्य लाभले.