शब्दपंढरी प्रतिष्ठान च्या वतीने सत्कार..
लातूर – लेखन व साहित्यचळवळ या दोन्हीही पातळ्यांवर बीजपेरणी करणारे धनंजय गुडसूरकर हे साहित्य दिंडीतील एक निष्ठावंत वारकरी आहेत” असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी योगिराज माने यांनी केले. माहूरच्याविभागीय शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष धनंजय गुडसूरकर यांचा शब्दपंढरी प्रतिष्ठान लातूरच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते अध्यक्षपदावरून बोलत होते .
व्यासपिठावर सत्कारमूर्ती धनंजय गुडसूरकर सौ.रुपा गुडसूरकर,
गझलकार जोश लातूरी,नरसिंग इंगळे व राजेंद्र माळी उपस्थित होते
धनंजय गुडसूरकर हे नवागतांना लिहिण्यासाठी सदैव प्रेरणा देतात.
विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड हा त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याचा गौरव आहे असे मत योगिराज माने यांनी पुढे बोलताना व्यक्त केले .
शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मिळालेला सन्मान हा मी मला साहित्य निर्मितीसाठी प्रेरित करणाऱ्यांना समर्पित करतो असे भावोदगार धनंजय गुडसूरकर यांनी सत्काराला उत्तर देताना काढले .
यावेळी दिलीप लोभे , कल्याण राऊत ,रमेश हणमंते, वृषाली पाटील , शैलजा कारंडे , सविता धर्माधिकारी ,गोपिका माळी, गोविंद गारकर, डोंबाळे सर यांनी मनोगत व्यक्त केले.
यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न झाले .