● श्री गुरूजी आयटीआयचा उपक्रम
लातूर ; वयाच्या ८४ व्या वर्षी प्रा.गिरीश सहदेव यांनी नविन पिढीला आदर्श निर्माण करणारे व यशाचा मार्ग दाखवणारे आत्मकथन पर ” गिरीशिखरे ” ह्या पुस्तकाचे लिखान केले. या बद्दल श्री गुरूजी आयटीआय च्या वतीने भूषण दाते व संजय प्र.अयाचीत यांच्या हाते शाळ श्रीफळ, पुष्पगुष्छ व सरांच्या जीवनावरील कवितेची प्रतिमा देऊन सहदेव सरांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी आयटीआयचे संचालक सुधाकर जोशी सर, महेश औरादे, वैभव कवठाळकर, रविकांत मार्कंडेय, विजय सहदेव, अतुल ठोंबरे, उपस्थित होते.
जेष्ठ शिक्षण तज्ञ, प्रसिध्द चित्रकार व जेष्ठ रंगकर्मी,रोटरीयन असे बहुआयामी व्यक्तिमत्व प्रा.गिरीश सहदेव यांच्या संपूर्ण जीवनावरील अनेक प्रेरणादाई प्रसंग या पुस्तकात आहेत ते सर्व प्रसंग वाचणीय आहेत व तरूणांसाठी प्रेरणादाई आहेत.
प्रा.गिरीश सहदेव यांच्या ” गिरीशिखरे ” ह्या आत्मकथन पुस्तकाचे प्रकाशन शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांच्या हस्तेनुकतेच संपन्न झाले आहे.
(फोटो तळटीप)लातूर;प्रा.गिरीश सहदेव यांचा श्री गुरूजी आयटीआय च्या वतीने गुणगौरव करण्यात आला यावेळी डावीकडून रविकांत मार्कंडेय, वैभव कवठाळकर,अतुल ठोंबरे,अर्कि विजय सहदेव,उत्सवमुर्ती प्रा.गिरीश सहदेव,भूषण दाते, संजय प्र.अयाचित, सुधाकर जोशी,महेश औरादे.