मुंबई: वैदिक हिंन्दु एज्युकेशन अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन, मुंबई द्वारा आयोजित धर्म रक्षा, सनातन संस्कृती सेवा व समर्पणासी दिला जाणारा “हिंदुत्वाचे आधारस्तंभ” पुरस्कार दि.०९/१२/ २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सहअध्यक्ष तथा श्री नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांना प्रदान करण्यात आला, त्याच बरोबर सद्गुरू नारायण महाराज, अर्थशास्त्रज्ञ व विचारवंत सुब्रमण्यम स्वामी, स्वामी कर्मवीर, स्वामी गिरीशनंद सरस्वती, महंत सीतारामदास निर्मोही गोवर्धन व डाॅ उमाकांतानंद सरस्वती महाराज यांना देखील राज्यपालांच्या हस्ते “हिंदुत्वाचे आधारस्तंभ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमात वैदही तमन यांनी लिहलेल्या जीवनचरित्राचे राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले, यावेळी सद्गुरू ॠतेश्वर महाराज, संस्थेच्या संस्थापिका व पत्रकार डाॅ वैदही तमन, गोरखनाथ महाराज, श्रीरंग महाराज, गिरीश पाटील, मेघराज बरबडे, महालिंग मंठाळे, ईतर सन्मानीय महाराज, महंत व मान्यवर उपस्थित होते.