डाॅक्टर-जानाईश्री पुरस्कार- डाॅ.प्रकाश आनंदगांवकर यांना जाहीर.
■ जानाई प्रतिष्ठानचा १ जुलै डाॅक्टर डे उपक्रम

श्री जानाई प्रतिष्ठान लातूर या संस्थेच्या वतीने दिला जाणारा वर्षे २०२२ चा
” डाॅक्टर-जानाईश्री ” पुरस्कार माजलगांव येथील हजारो गरीब लोकांचे फॅमिली डाॅक्टर ” डाॅ.प्रकाश आनंदगांवकर यांना त्यांच्या वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, अध्यत्मिक राजकीय, सहकार क्षेत्रातील नि:स्वार्थ सेवेबद्दल १ जुलै २०२२
“ डाॅक्टर डे “ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
रू २५,०००/- रोख, मानपत्र, महावस्त्र, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवार दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता जानाई फंक्शन हाॅल लातूर येथे पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न झाला. रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे प्रांत उपाध्यक्ष प्रा.डाॅ.रमेश जोशी सरांच्या हस्ते डाॅ.प्रकाश आनंदगांवकर यांना हा पुरस्कार देवून सन्मानित केले करण्यात आले.
गरीबांचा डॉक्टर …मोठ्या मनाचा दिलदार डॉक्टर…. जनसामान्यांना आपले वाटणारे डॉक्टर… डॉ. प्रकाश आनंदगांवकर(माजलगाव) यांच्या सत्कार सोहळ्यावर आधारित हा व्हीडीओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहावा ही विनंती.
व्हिडीओ पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇👇👇👇👇
https://youtu.be/VECYwRMMcI4
Madhyam vrutt या यूट्यूब चँनलला लाईक, शेअर आणि सबस्काईब करा
संपादक – गोपाळ कुळकर्णी
9422071166
8104088722
8459987911